अतिक्रमण विभागाची आज सातपूर येथे धडक कारवाई

0

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाने आज सातपूर परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली. येथील हॉटेल नालंदा येथील शेडचे, हॉटेल अन्नपुर्णा यांचे शेडचे बांधकाम, सायंतारा बिल्डींग, सावरकर नगर येथील अतिक्रमण काढण्यात आले.

 

या ठिकाणी पालिकेच्या जागेवर ना फेरीवाला क्षेत्र, सार्वजनिक रस्ते, फुटपाथ ए ठिकाणी अतिक्रमण करून व्यवसाय करणारे भाजीविक्रेते, फळविक्रेते, हॉकर्स, टपरीधारक, तत्सम व्यावसायिक यांच्याविरुद्ध अशाच प्रकारची कारवाई करून प्रसंगी पोलीस विभागात गुन्हे दाखल करण्यात येतील अशा इशाराही अतिक्रमण विभागातून दिला आहे.

ही मोहीम श्रीमती. निर्मला गायकवाड विभा.अधिकारी-सातपूर, नगरनियोजन विभागाचे अभियंता श्री. नांदुर्डीकर, महेंद्रकुमार पगारे यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली. यावेळी अति. विभागाचे २ पथक, १ जेसीबी, अतिक्रमण निर्मूलन पोलीस बंदोबस्तसह अतिक्रमण काढण्यात आले.

LEAVE A REPLY

*