Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दोन दिव्यांग दांपत्य अडकली लग्नबंधनात

Share

नाशिक । प्रतिनिधी
द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन नाशिक आणि मराठा मुद्रा महिला मंडळाच्या वतीने सामाजिक कृतज्ञतेच्या भावनेतुन दोनं दाम्पत्यांचा विवाह सोहळा आणि 60 विद्यार्थ्यांना पुस्तके आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

वेदमंत्रांच्या घोषात सोनाली सुरासे, राजेंद्र पाटील आणि अब्दुल दस्तगीर शेख, नजीर शेख यांचा विवाह झाला. या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात पाच विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, मराठा मुद्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रतिभा होळकर, उद्योजक अजित बने, हिरामण आहेर, नगरसेविका स्वाती भामरे, ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरुण भारस्कर, मानद अध्यक्ष कल्पना पांडे आदी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी नवदांपत्यांना शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त करताना आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या, दिव्यांगांनाही सामाजिक कार्य याची चांगली दृष्टी असते हे या उपक्रमातून लाईट हेल्थ ऑर्गनायझेशन सिद्ध केले आहे.

महानगर पालिकेच्या अर्थसंकल्पात दिव्यांगासाठी पाच टक्के निधी राखीव असतो संस्थांनी त्याचा फायदा घेऊन दिव्यांगांसाठी काम करावे यासाठी प्रशिक्षणाची योजना असून त्यासाठी नाव नोंदणी चालू असल्याचे त्यांनी सांगितले राधाकृष्ण गमे म्हणाले की, महापालिकेतर्फे दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत असून दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी राखीव आहे.

ब्लाइंड सारख्या दिव्यांगांसाठी काम करणार्‍या संस्थेमार्फत दिव्यांग प्रशिक्षणासाठी कम्प्युटर ट्रेनिंग वाचनालय यासारखे उपक्रम राबविता येतील त्यासाठी संबंधित संस्थांनी मनपाकडे प्रस्ताव दिल्यास त्याचा विचार करण्यात येईल असेही ते म्हणाले.

मराठा मुजरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रतिभा होळकर यावेळी बोलताना म्हणाल्या की, सामाजिक ऋण फेडण्याच्या भावनेतून हा विवाह उपक्रम राबविण्यात आला आहे यावेळी उपस्थितांनी वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या विजया दुबे, सपना चांडक यांनी परिश्रम घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!