Type to search

Breaking News Featured टेक्नोदूत मुख्य बातम्या

जाणून घ्या ! व्हॉट्सअँपवर आपल्याला कुणी ब्लॉक केलंय ते

Share

भारतात इन्स्टेंट मेसेजिंग अँप व्हॉटसअपचे जवळपास २० करोड यूझर्स आहेत. अनेकांच्या जिव्हाळ्याचं बनलेल्या व्हॉट्सअँपने जीवन अगदी सोपे करून टाकले आहे. याच्या वापराने संपर्कात राहणे अगदी स्वस्तच झालेले आहे. अनेक कंपन्यांच्या मोफत डेटा पॅकमुळे ग्राहकांना ऑनलाइन राहण्यास मदत होत आहे.

परंतु कारण नसतांना उगाचच मेसेज येणे हे अनेक जणांना त्रासदायक वाटत आहे. तसेच बऱ्याच जणांना काही जणांशी संपर्कात राहायचे नसते. अशावेळीस या कटकटीतून मुक्त होण्याकरिता ते व्हॉट्सअँप मधील ‘कॉन्टॅक्ट ब्लॉक’चा पर्याय निवडून त्यांचा मोबाईल क्रमांक ब्लॉक करतात.

कदाचित तुम्हालाही कुणी व्हॉट्सअँप वर ब्लॉक केले असेल परंतु सहजासहजी हे आपल्याला कळत नाही. अशावेळीस एखाद्या व्हॉटसअप युसर्सने आपल्याला ब्लॉक केलं आहे हे ओळखण्याकरिता खालील गोष्टी जाणून घ्या :

> जर कुणाला तुमच्या नंबरवरून व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉल जात नसतील तर त्या व्यक्तीने तुमचा नंबर ब्लॉक केला असेल असे समजायला हरकत नाही

> जर कुणी आपल्याला व्हॉट्स अॅपवर ब्लॉक केले असेल तर त्याचा फोटो, स्टेटस किंवा लास्ट सीन इत्यादी आपल्याला दिसत नाही.परंतु प्रायव्हसी सेटिंग्स मध्ये काही बदल केल्यानेसुद्धा या गोष्टी दिसत नाही.

> व्हॉट्स अँपवर मेसेज केल्यानंतर आणि तो संबंधित व्यक्तीला पोहचल्यावर दोन टिक येतात. परंतु त्या व्यक्तीने जर तुम्हाला ब्लॉक केले असेल तर त्याला मेसेज जात नाही आणि त्यावेळीस दोन ऐवजी एकच टिक दिसते.

एखाद्यावेळेस संबंधित व्यक्तीचा मोबाईल स्विच ऑफ असण्याची किंवा नेटवर्क प्रोब्लेममुळेही त्याला मेसेज न पोहचण्याची ची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळेस त्याचा फोटो, स्टेटस, लास्ट सीन न दिसणे आणि मेसेज केल्यानंतर फक्त एक टिक दिसणे या सर्व लक्षणांमुळे संबधित व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे असे मानण्यास हरकत नाही.

-प्रा. योगेश हांडगे

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!