Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

भारतीय भाषांमध्ये येणार विज्ञान संज्ञा

Share

नाशिक । विज्ञान तसेच माहिती तंत्रज्ञान विषयातील अनेक किचकट इंग्रजी संकल्पना सामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी त्या संज्ञा आणि उपलब्ध सर्व माहिती भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावी यायासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यासाठी एक विशेष समिती तयार करण्यात आली असून सर्व इंग्रजी माहितीचे सध्या हिंदीत भाषांतर करण्याचे काम सुरू आहे.

अनेकदा अनेक वैज्ञानिक शब्दांना भारतीय भाषांमधील शब्द उपलब्ध नसल्याने त्यातील माहिती त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. ही अडचण लक्षात घेऊन केंद्राच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाअंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञानातील सर्व शब्द भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी विकिपीडियाची मदत घेण्यात आली आहे. सध्या हा प्रकल्प हिंदी भाषेत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सध्या विकिपीडियावर विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित सुमारे 50 लाख लेख उपलब्ध आहेत. यातील अवघे एक लाख 25 हजार लेख हिंदीत उपलब्ध आहेत. ही संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी मशिन लर्निंग आणि काही शास्त्रज्ञांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील तपशील भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावा या उद्देशाने एक तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या माध्यामातून हे काम सुरू आहे. हिंदीतील लेखांचे भाषांतर झाल्यानंतर इतर भारतीय भाषांमधील लेखांवरही भर देण्यात येणार आहे.

मशिन लर्निंग!
मोठ्या प्रमाणावर भाषांतर करण्यासाठी तसेच नवीन मजकूर तयार करण्यासाठी विविध प्रकारच्या सॉफ्टवेअर्सचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये प्राथमिक भाषांतर झाल्यानंतर भाषा तज्ज्ञ तसचे शास्त्रज्ञांच्या साह्याने ते अचूक करून घेतले जाणार आहे. या प्रकल्पासाठी सात ते 10 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच तीन वर्षांत तो पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!