Video : आता महिलांच्या सुरक्षेसाठी ‘Easy To Go App’; नाशिकपासून सुरवात

0

नाशिक : महिलांच्या सुरक्षेसाठी संगमनेर येथील रोहित मोरे या युवकाने Easy To Go App नावाचे अँप तयार केले आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी या ऍपचा उपयोग महिलांना होणार आहे.

ऑफिस किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी, प्रवास करतांना महिलांना विनयभंग, छेडछाडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. शासनाकडून महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यापैकी या अँपची भर पडली आहे. .

ऑफिस, सार्वजनिक ठिकाणे, येथे महिलांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी या ऍपचा उपयोग होत आहे. एका क्लिकवर आता काेणत्याही गरजू महिला, मुलींना या अपद्वारे मदत मिळू शकेल. Easy to Go App यासाठी तयार करण्यात आले आहे. ऑफिसच्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी, असुरक्षित ठिकाणहून सुरक्षित ठिकाणी पाठवण्यासाठी, कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी तात्काळ मदत उपलब्ध व्हावी यासाठी संगमनेर येथील वडगावपान येथील रोहित मोरे या तरुणाने केलेली ही उपाययोजना फायद्याची ठरणार आहे. यामध्ये पुरुषांनाही या ऍपची मदत होणार आहे. स्मार्ट फोनवर हे अ‍ॅप महिलांना उपलब्ध होईल. या अँपची सुरवात नाशिक शहरातून करण्यात येणार आहे. मंगळवार (ता.०५) रोजी अँपचे उदघाटन करण्यात येणार आहे.

असा होईल ऍपचा वापर                                                                                                         या अँप मध्ये महिला प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी त्यांच्या घरापासून Easy To Go या कंपनी मार्फत दुचाकी घेण्यासाठी अथवा सोडण्यासाठी येईल आणि तेही कंपनीची महिला कर्मचारी ही सेवा पुरवतील म्हणजे यातून महिलांची सुरक्षा देखील वाढेल आणि ने आण करणाऱ्या महिलांना रोजगार देखील उपलब्ध होईल. तसेच हाच नियम पुरुष प्रवाशांना असेल यात देखील पुरुषांना पुरुषच PICKUP/DROP ची सेवा पुरवतील.

कसे जॉईन व्हाल ?
Easy to go या अँप मध्ये जोडण्यासाठी http://www.easytogo.co.in/join-your-form/ या लिंक च्या द्वारे join होऊ शकतात. अँप इन्स्टॉल केल्यानंतर मो. क्रमांक, इमेल, नाव आणि छायाचित्र प्रविष्ट करा. त्यानंतर आपली नोंदणी होईल. नोंदणी झाल्यानंतर आपल्याला हे अँप वापरता येईल. याप्रमाणेच पुरुषही नोंदणी करू शकतील. विशेषकरून महिलांना यात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. या अँपमधील काही नफा हा महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी तसेच बेटी बचाव बेटी पढाव आणि इतर उपक्रमासाठी वापरण्यात येणार आहे.

मी महिंद्रा मध्ये डिसाईन इंजिनिअरिंगला असतांना घरी जाताना प्रवासादरम्यान महिलांना त्रास सहन करावा लागतो. सुरक्षा, असुविधा अशा बऱ्याच गोष्टींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी Easy To Go App हे अँप नाशिकमध्ये येत्या ५ फेब्रुवारीला लाँच करत आहोत. यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षेची काळजी घेताना त्यांना यापुढे प्रवास करावयाचा असल्यास ते या अँपचा वापर करू शकतात.
-रोहित मोरे, अँपनिर्माता

LEAVE A REPLY

*