Type to search

Breaking News आवर्जून वाचाच टेक्नोदूत मुख्य बातम्या

मोबाइलमधील इंटरनेटचा डेटा वाचवण्यासाठी ‘ही’ घ्या काळजी!

Share

नाशिक : अनेकदा आपल्या मोबाइलचा डेटा नकळत खर्च होत असतो. यामुळे इंटरनेटचा कमी वापर करून देखील वापरले तरी इंटरनेट पॅक लवकर संपतो. मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताना काळजी घेऊन डेटाचा खर्च कमी केला तर आपले पैसे वाचविता येतील. मोबाइलमधील इंटरनेटचा डेटा वाचविण्याकरिता कुठले उपाय उपलब्ध आहेत, याबद्दल जाणून घेऊया.

गुगलचे नवे ‘ट्रँगल अँप

सध्या या अपची फिलीपाईन्स देशात चाचणी सुरू असलेल्या गुगलच्या अँपमध्ये मोबाइल डेटाची बचत करण्याचं संपूर्ण सोल्युशन ‘ट्रँगल’मध्ये असेल. आपल्याला माहित नसताना ‘घुसखोरी’ करणारे अनेक अँप देखील ब्लॉक करण्याची सोय या अँपमध्ये आहे.
ट्रँगल अँप मध्ये काही अँप केवळ १० ते १५ मिनिटंच सुरू ठेवण्याची परवानगी आपण देऊ शकतो. या अँपमध्ये मोबाइलचा डेटा बॅलन्स आणि वापरलेला डेटा अशी माहिती आपल्याला स्क्रीनवर दिसते. सध्यादेखील हा अँप गुगल प्लेवर उपलब्ध आहे. मात्र तो केवळ ठराविक भागासाठी कार्यरत असल्याने डाऊनलोड करता येणार नाही.

ऑटो अपडेटिंग अँप

गुगल प्लेमध्ये होणारे अँप अपडेशनमुले मोबाइलचा सर्वाधिक डेटा खर्च होतो . बहुतेक स्मार्टफोन वापरकर्ते प्ले स्टोअरमध्ये ‘सेट टू ऑटो अपडेट्स अँप्स’ असा पर्याय निवडता ज्यामुळे मोबाइलमधील अँप्सचे अपडेटेड व्हर्जन बाजारात दाखल झाल्यावर लगेच त्यांचे अँप अपडेट होते ज्यासाठी मोबाइलचा सर्वाधिक डेटा खर्च होतो.

हा डेटा खर्च वाचविण्याकरिता प्ले स्टोअरमध्ये जाऊन ऑटो अपडेट अँप्स ऐवजी ‘डू नॉट ऑटो अपडेट अँप्स ’ किंवा ‘ओन्ली ओव्हर वाय-फाय’ हा पर्याय निवडावा. त्यामुळे अँप आपोआप अपडेट होणार नाही. काही ठरावीक अँप्सबाबतीत ही सुविधा हवी असेल, तर तुम्ही प्रत्येक अँप च्या सेटिंग्जमध्ये ‘डू नॉट ऑटो अपडेट अँप्स’ पर्याय निवडावा

रिस्ट्रिक्ट बॅकग्राऊंड डेटा

अनेकदा अँप आपण काहीही काम करत नसताना इंटरनेट खर्च करतात. थांबविण्याकरिता करण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन डेटा युसेजचा पर्याय निवडल्यावर तुम्हाला कोणते अँप किती डेटा वापरतो याची माहिती मिळेल. त्यानंतर प्रत्येक अँप सुरू केल्यावर तेथे खालच्या बाजूस असलेला ‘रिस्ट्रिक्ट बॅकग्राऊंड डेटा’ असा पर्याय निवडावा. ज्या मुळे अँप बंद असताना खर्च होणारा डेटा खर्च होणार नाही.

-प्रा. योगेश हांडगे

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!