Type to search

एमजी मोटरद्वारे भारतातील पहिल्या इंटरनेट कारचे अनावरण

Breaking News टेक्नोदूत नाशिक मार्केट बझ मुख्य बातम्या

एमजी मोटरद्वारे भारतातील पहिल्या इंटरनेट कारचे अनावरण

Share

मुंबई : प्रसिद्ध ब्रिटिश कार निर्माता एमजी मोटर (मॉरिस गॅरेज) ने आयस्मार्ट नेक्स्ट जेनच्या लॉन्चसह भारतात एक अभूतपूर्व अशी टेक्नॉलॉजी सादर केली. आयस्मार्ट नेक्स्ट जेन वैश्विक टेक्नॉलॉजी कंपन्यांच्या भागिदारीतून विकसित करण्यात आली आहे. आयस्मार्ट नेक्स्ट जेनने सुसज्ज एमजी हेक्टर ही भारतातील पहिली इंटरनेट कार असेल जी कनेक्टेड मोबिलिटीचे मूर्त स्वरूप असेल.

मायक्रोसॉफ्ट, अडोब, अनलिमिट, एसएपी, सिस्को, गाना, टॉम टॉम आणि न्यूआन्स यांसह इतर वैश्विक टेक भागीदारांच्या सशक्त संघटनेसह या कार निर्मात्या कंपनीने इंटरनेट-सक्षम कारची अनेक नवीन वैशिष्ट्ये प्रस्तुत केली. जी एमजी हेक्टरमध्ये उपलब्ध असतील.

एमजी हेक्टरचे सर्वात अद्भुत असे फीचर म्हणजे व्हॉईस असिस्ट. हे एक दमदार व्हॉईस अप्लिकेशन आहे, जे क्लाउड आणि हेड युनिटवर चालते. न्यूआन्सने ते एमजी इंडियासाठी विकसित केलेले असून ते विशेष करून भारतासाठी भारतीय उच्चारांनुसार बनवले आहे. यातील बिल्ट-इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग अल्गोरिदम्समुळे वापर वाढत जाईल तसतशी ही प्रणाली शिकत जाईल आणि अधिकाधिक चांगली होईल.

हे व्हॉईस असिस्ट ‘हॅलो एमजी” म्हटल्याने सक्रिय होते व १०० कमांड्स जाणते, ज्यात खिडक्या आणि सन-रूफ उघडणे किंवा बंद करणे, एसी नियंत्रण, नेव्हिगेशन, इ.चा समावेश आहे. तसेच, ते कनेक्टिव्हिटी क्षीण असली तरी काम करते.

आयस्मार्ट नेक्स्ट जेन हे आयस्मार्ट मोबाइल अपद्वारा समर्थित आहे. एमजी आयस्मार्ट अप मध्ये अशी अनेक फीचर्स आहेत, जी भारतीय बाजारात अजून आलेली नाहीत. प्रत्येक वेळी अप सुरू केल्यानंतर कार स्कॅन केली जाते आणि कारचे लोकेशन, टायरमधील प्रेशर किंवा दार लॉक झालेले आहे की नाही अशा प्रकारची माहिती त्यात आहे.

मालक दरवाजे थेट लॉक किंवा अनलॉक करण्यासाठी, इग्निशन सुरू करण्यासाठी आणि एअर कंडिशनर सुरू करण्यासाठी रिमोट अप वापरू शकतात. भारतातील तीव्र हवामान परिस्थितीत हे खूप उपयोगी आहे. हे मालकाला सर्व्हिसचे वेळापत्रक बनवायला देखील मदत करते आणि सर्व्हिस केल्याचा माग देखील ठेवते.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री राजीव छाबा म्हणाले, “इंटरनेट आणि कार्सच्या एकत्रीकरणामुळे नव्या फीचर्सचा मार्ग खुला होईल व त्यामुळे भारतातील एमजीच्या ग्राहकांना एक निर्विघ्न आणि अपडेटेड स्वामित्वाचा अनुभव मिळेल. एम्बेडेड सिमकार्ड आणि ओटीएसह एमजी हेक्टर हळूहळू अनेक नवीन गोष्टी करेल, आपल्या क्षमता सतत विस्तारित जो सतत निर्विघ्न ड्रायव्हिंगचा अनुभव देईल.

शिवाय भारतात ५ जी कनेक्टिव्हिटीच्या आगमनाने एमजी कार्स नवीन, अभूतपूर्व फीचर्स दाखल करण्यास सक्षम होईल व त्यामुळे कार ड्रायव्हिंगचा अनुभव आणखी सुधारेल.”

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!