Type to search

Breaking News टेक्नोदूत मुख्य बातम्या

हिरोची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात

Share

पुणे : आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकींचा ब्रँड असलेल्या हिरो इलेक्ट्रिकने नवीन डॅश इलेक्ट्रिक स्कूटरची घोषणा केली. वापरण्यास सोपे व उच्च गुणवत्तेच्या ई-स्कूटर्सच्या आकर्षक श्रेणीचा कंपनीचे विस्तार केला. त्याचबरोबर भारतात ऑप्टिमा व एनवायएक्स ईआर या मजबूत आणि उच्च वेगाच्या ई-स्कूटर्सच्या विस्तारित श्रेणीचे व्हेरिएंटस प्रदर्शित केले. हिरो डॅशनची किंमत 62 हजार रुपयांपासून पुढे आहे.

अधिक स्मार्ट मोबिलिटी सोल्युशन्सचा पर्याय पसंत करणारे व पर्यावरणाबाबत जागरूक असलेल्या ग्राहकांना सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रिक टू-व्हिलर मोबिलिटी सोल्युशन्स पुरविण्याकरिता हिरो इलेक्ट्रिक कटिबध्द आहे, असे सांगून हिरो इलेक्ट्रिक इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहिंदर गिल अनावरण प्रसंगी म्हणाले, ‘डॅश’ वाहन अद्ययावत व किफायतशीर असून पोर्टेबल व विश्वसनीय मजबूतीवर एलआय-आयओएन बॅटरीसह व्यावहारिकता, कार्यक्षमता व आधुनिक शैली प्रदान करते. सर्व वयोगटातील लोकांना हे उत्पादन पसंतीचे ठरेल याचा आम्हाला विश्वास आहे. ग्राहकांचा अभिप्राय लक्षात घेत आम्ही नेहमीच नवीन व अधिक चांगली उत्पादने आणण्यासाठी प्रयत्नशील राहू.

ई-स्कुटर्सच्या विविध श्रेणींचा पर्याय ग्राहकांना देण्यासाठी असलेल्या आपल्या कटिबध्दतेअंतर्गत हिरो इलेक्ट्रिकने या कार्यक्रमांत ऑप्टिमा ईआर व एनवायएक्स ईआर प्रदर्शित केले.

डॅशची वैशिष्ट
नवीन व आकर्षक डॅश इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये 48 व्ही 28 एएच एलआय-आयओएन बॅटरी 4 तासाच्या फास्ट चार्जिंगसह प्रतिचार्ज 60 किमी क्षमता आहे. भारतातील ड्राइव्हिंग कंडिशन्स लक्षात घेता 145 एनएम एवढा उच्च ग्राऊंड क्लिअरन्स डॅशमध्ये आहे. नवीन डॅशमध्ये एलईडी डीआरएल,एलईडी हेडलाईटस, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, युएसबी मोबाईल चार्जिंग पोर्ट, ट्युबलेस टायर्स, ड्युएल टोन बॉडी कलर व ग्राफिक्स, वास्तविकता लक्षात घेऊन रिमोट बूट ओपनिंगसारखी वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये आकर्षक डिझाईन, प्रभावी फ्रंट फेशिया आणि ड्युएल टोन कलर पर्याय आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!