अखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट

0

नाशिक : देशभरात धुमाकूळ घातलेल्या टिकटॉकला अखेर प्ले स्टोर वरून हटविण्यात आले आहे. त्यामुळे आता अनेकांचे स्मार्टफोन, सोशल मीडिया, युट्युब आदीवंर धुमाकूळ घालणारे टिकटॉक व्हिडीओज यापुढे युजर्सना तयार करता येणार नाहीत.

दरम्यान मद्रास उच्च न्यायालयाने या अँपवर कारवाई करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. त्यानंतर केंद्र सरकारने टिकटॉक हे अँप काढून टाकण्याबाबत गूगल आणि अँपल कंपनीला आदेश दिले होते. कारण Porn Videos वर आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अँपलकडूनअँप डिलीट करण्यात आले आहे. केंद्र सरकारचे आदेश प्रमाण मानत या दोन्ही कंपन्यांनी टिकटॉक अँप हटवले आहे.

टिकटॉक वर कोणत्या प्रकारचा आशय किंवा व्हिडीओ तयार करावा याबाबत नियंत्रण नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. यामुळे अनेक समस्या निरमा झाल्या होत्या. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गुगल आणि अँपल कंपनीला टिकटॉकवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

LEAVE A REPLY

*