Photo Gallery : शिक्षक मतदार संघ निवडणुकीची तयारी पूर्ण; पोलीस बंदोबस्तात मतदान साहित्य सुपूर्द

0
नाशिक । प्रतिनिधी – नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात झाली आहे. विभागातील धुळे, जळगाव, नंदूरबार, नगर आणि नाशिक या पाचही जिल्ह्यातील 94 मतदान केंद्रावर सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
या निवडणुकीकरिता 53 हजार शिक्षक मतदान आपला मतदानाचा हक्क बजावतील. आज मतदान केंद्र अधिकार्‍यांना मतदान साहित्य पोलीस बंदोबस्तात सुपूर्द करण्यात आले.

नाशिक शिक्षक विभाग मतदार संघासाठी  16 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीकरिता 53 हजार 335 मतदार आहेत. या निवडणुकीकरिता नाशिक जिल्ह्यात 25 मतदान केंद्रांवर मतदान होईल. यात बागलाण 2, मालेगाव शहर 2, येवला 2, निफाड 2, नाशिक शहर 6 केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.

तर प्रत्येक मतदान केंद्रावर 6 याप्रमाणे 150 अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यंदा मतदानाची वेळही दोन तासांनी वाढविण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी 25 सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतदानासाठी ही ओळखपत्रे सोबत घेऊन जा

मतदान केंद्रावर भारत निवडणूक आयोगाच्या छायाचित्र मतदार ओळखपत्राशिवाय इतर 13 ओळखपत्रे मतदान करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. पारपत्र (पासपोर्ट), वाहन परवाना, पॅनकार्ड, पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र, शासकीय-निमशासकीय-सार्वजनिक उपक्रम विभागाचे सेवा ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँक पासबुक, नोंदणीकृत दस्त, शिधापत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, एनपीआर अंतर्गत असलेले ओळखपत्र यांचा समावेश आहे.

मतदान केंद्र

सुरगाणा तालुका  – तहसील कार्यालय,

कळवण – कुळकायदा शाखा,

देवळा – नवीन प्रशासकीय इमारत,

बागलाण – जिजामाता कन्या विद्यालयात दोन केंद्र,

मालेगाव ग्रामीणसाठी – नवीन तहसील कार्यालयातील निवडणूक शाखा,

मालेगाव शहरात नवीन तहसील कार्यालयातील तहसील चेंबर, तसेच मिटिंग हॉल,

नांदगाव  – अध्यापक विद्यालय,

येवला – स्वामी मुक्तानंद विद्यालयात दोन केंद्र,

चांदवड – नवीन प्रशासकीय इमारत,

निफाड – तहसील कार्यालयात दोन केंद्र,

दिंडोरी व पेठ तालुक्यांतील तहसील कार्यालय,

नाशिक शहरातील सर्व मतदान केंद्र बी.डी.भालेकर मैदान शाळेत होणार आहे.

त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर तालुक्यातील केंद्र तालुक्याच्या तहसील कार्यालयात मतदान होणार आहे.

फोटो : सतीश देवगिरे, देशदूत नाशिक

LEAVE A REPLY

*