नाशिक शिक्षक मतदारसंघात उमेदवारीवरून फूट : नगर जिल्ह्याला ठेंगा, सभासदांमध्ये संताप

0

संदीप बेडसे यांना उमेदवारी

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून टीडीएफ कडून संदीप बेडसे यांना उमेद्वारी देताना अध्यक्ष विजय बहाळकर, माजी आ. नानासाहेब बोरस्ते, श्री. पवार आदी.

अस्तगाव (वार्ताहर) – नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिक्षक लोकशाही आघाडीच्या (टीडीएफ) राज्य पातळीवरील पदााधिकार्‍यांनी धुळ्याचे संदीप बेडसे यांची उमेदवारी निश्चित केली आहे.

पुणे येथे केवळ मुलाखतींचा फार्स केला असल्या कारणाने नगर, नाशिक, धुळे, जळगाव, या जिल्ह्यांतील 10 इच्छुकांनी टीडीएफ च्या या मुलाखतींवर बहिष्कार टाकत या पदाधिकार्‍यांचा विरोधात घोषणा देत निषेध केला. तर या 10 इच्छुकांनी आता विभागीय टीडीएफ नावाच्या संघटनेच्या नावाने उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला असून टीडीएफमध्ये यामुळे फूट पडली आहे.

आठ महिन्यांंनी विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. पुणे येथील पुणे वसतीगृहात टीडीएफचे राज्याचे अध्यक्ष विजय बहाळकर, हनुमंत भोसले, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, जे. यू. ठाकरे, पी. एफ पवार, श्री. भामरे, नगर जिल्ह्यातील आबासाहेब कोकाटे, सुधीर काळे, अशोक नवल, सुभाष पानसंबळ, अदींंच्या उपस्थितीत मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यातील प्रा. भाउसाहेब कचरे, राजेंद्र लांडे, अप्पासाहेब शिंदे, एम. एस. लगड, तसेच जळगावचे शालिग्राम ज्ञानदेव भिरूड, धुळ्याचे निशांत रंधे, नाशिकचे एस. बी. देशमुख, मालेगावचे ए. एस. आठर, तसेच धुळ्याचे संदीप बेडसे, जळगावचे मनोज पाटील या 12 जणांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या.

या मुलाखती सुरु होण्यापूर्वीच माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे ओएसडी म्हणून राहिलेले धुळ्याचे संदीप बेडसे यांना टीडीएफची उमेद्वारी जाहीर होणार असल्याची माहिती समजल्यावर बेडसे व मनोज पाटील वगळता अन्य 10 जणांनी या मुलाखतींवरच बहिष्कार टाकला. तसेच निवेदन त्यांनी टीडीएफचे राज्याध्यक्ष विजय बहाळकर यांना दिले. दरम्यान मुलाखत ठिकाणी विजय बहाळकरांना बाउंसर चा बंदोबस्त होता.

या मुलाखती घेणार्‍यांची वाहने गेट मध्ये आडवून समर्थकांनाही आत वसतीगृहाच्या परिसरात येण्यास मज्जाव केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच या सर्व शिक्षकांनी वसतीगृहात प्रवेळ मिळवत टीडीएफच्या या पदाधिकार्‍यांचा निषेध केला. टीडीएफचे हे पुढारी विकले गेल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मुलाखतींवर बहिष्कार टाकल्याने केवळ संदीप बेडसे व मनोज पाटील या दोन उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

यावेळी टीडीएफचे राज्य उपाध्यक्ष चांगदेव कडू यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. या बैठकीत 10 पैकी कोणाही एकाने उमेदवाराने उमेदवारी करुन इतरांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. यावेळी बोलतांना इच्छुक उमेद्वार अप्पासाहेब शिंंदे म्हणाले, टीडीएफच्या इतिहासातील काळा दिवस आज ठरला.

आम्हा 25 व 30 वर्षे टीडीएफ शिक्षक संघटनेसाठी हयात घालणार्‍या प्रामाणिक लोकांना टाळून 4 महिन्यांपूर्वी संघटनेशी काही संबधही नसताना फक्त उमेदवारी साठी सलगी करणार्‍या नामधारी शिक्षकास उमेदवारी देण्याचा घाट घातला आहे.

याविरोधात आम्ही नाशिक शिक्षक मतदारसंघातील इच्छुक 10 उमेदवारांपैकी कोणीही एका उमेदवारास उमेदवारी देऊन विजयी करणार आहोत व विकाऊ पदााधिकार्‍यांना धडा शिकवून उमेदवार विजयी करु. यावेळी इच्छुक प्रा. भाऊसाहेब कचरे म्हणाले, टीडीएफमध्ये हा प्रकार आजच घडतो असे नाही, तिकीट वाटपावरुन नेहमीच निष्ठावंतांना डावलले जाते व वशिलेबाजी करुन नातेवाईक, पैशावाला यांना उमेदवारी दिली जाते.

गेल्या वेळीही हाच प्रकार घडला. जे. यू. ठाकरे यांचे बेडसे हे मेहुणे आहेत. मागे जे. यू. ठाकरे यांना सर्वसामान्य शिक्षकांनी मतदान केले. जे शिक्षकांसाठी अहोरात्र झटतात त्यांची मागणी टाळली जाते. या विरोधात एकास एक उमेदवार देऊन व सर्व पुरोगामी संघटना एकत्र करुन निवडणूक लढविण्याची गरज आहे.

तिकीट विकणे ही प्रवृत्ती वाढत आहे. सक्षम नेतृत्वावालाच शिक्षक मतदान करतील. यावेळी शालिग्राम भिरुड, निशांत रंधे, आर. डी. निकम, राजेंद्र लांडे, विठ्ठल पानसरे, एस. बी. देशमुख, लाठर, एम. एस लगड यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण ठोंबरे यांनी केले.

यावेळी वाल्मिकराव बोठे, सूर्यकांत डावखर, मच्छिंद्र गाडेकर, जाकीर सय्यद, ज्येष्ठ शिक्षकनेते सुभाष कुलकर्णी, चांगदेव कडू महाराष्ट्र राज्य शिक्षक फेडरेशनचे उपाध्यक्ष नंदकुमार शितोळे, प्रा. रमेश आठरे, केशव गुंजाळ, प्रशांत होन, संतोष ठाणगे, सुनील दानवे, मंगेश काळे, विजय थोरात, उद्धवराव सोनवणे, महेंद्र हिंगे, अर्जुन भुजबळ, जनार्दन पटारे, भाऊसाहेब जिवडे, सुदाम दळवी, हरिश्‍चंद्र नलगे, सुधीर काळे यांसह नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या पाच जिल्ह्यांतील शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*