Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

#NashikTallent : साडेतीनशे ‘घुबड पेंडट’ची केली निर्मिती

Share

डुबेरे । सुनिल जाधव

खरे तर घुबड हा पक्षी समाजात अशुभ असल्याचे मानले जाते. मात्र, एका अवलियाकडून साडेतीनशेहून अधिक ‘घुबड पेंडट’ची निर्मिती करुन शुभ-अशुभतेच्या चक्रव्यूहात सापडलेल्या या पक्षाबद्दल समाजात जागृती करण्याचा प्रयत्न होत आहे.

सिन्नर येथील डॉ. प्रशांत वाघ हे गेल्या सहा वर्षांपासून घुबड या पक्षाच्या विविध आकारचे पेंडट तयार करीत असून सध्या त्यांच्याकडे नाना प्रकारचे घुबड पदक दागिने आहेत.

त्यामध्ये 300 प्रकारचे पदक,  20 प्रकारचे कानातले डूल, कोटावर लावायचे ब्रांँच व 4 प्रकारच्या अंगठ्या त्यांनी तयार केलेल्या आहेत. डॉ. वाघ यांनी पुणे येथील पहिले घुबड महोत्सवात तसेच टीएलसी आयोजित कलादालन येथेही सहभाग नोंदविला आहे.

या प्रदर्शनात विश्वास ग्रुपचे विश्वास ठाकूर आणि ‘ग्रंथ तुमच्या दारी’चे प्रणेते विनायक रानडे यांचे सहकार्य डॉ. वाघ यांना लाभले. 4 ऑगस्ट या आंतरराष्ट्रीय घुबड जागृकता दिनाच्या दिवशी हैदराबाद येथे सहा वर्षांपूर्वी ही प्रेरणा मिळाल्याचे डॉ. वाघ सांगतात.

काम करून फावल्या वेळेत वाघ यांनी आपला छंद जोपासला असून त्यासाठी त्यांना पत्नी दिपाली, मोठे बंधू किरण वाघ यांचे सहकार्य लाभले. वाघ यांनी नांदूरमध्यमेश्वर येथील हिवाळ्यात होणाऱ्या स्थलांतरित पक्षांवर पीएचडी मिळवली आहेत. त्यामुळे पक्षी व निसर्ग अभ्यासात त्यांना विशेष आवड असल्याने त्यांनी हा छंद जोपासला आहे.

डॉ. वाघ यांच्या या अनोख्या घुबड पेंडट संग्रहाचे परिसरातून कौतुक होत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये घुबडाला धनसंपत्तीची प्रतीक मानले जाते. त्याला लक्ष्मीचे वाहन म्हटले आहे.

तर दुसरीकडे मात्र घुबडाचे तोंड पाहाणे हे अशुभ मानले जाते. त्यामुळे आपल्या देशात  हा पक्षी शुभ – अशुभ चक्रात अडकल्याने अंधश्रद्धेचा बळी ठरतो आहे.

पर्यावरणाचा समतोल राखायचे असेल तर घुबडांना वाचविण्याचे व त्यांच्या बद्दल जागृकता निर्माण करणे  गरजेचे आहे. यासाठी डॉ. वाघ यांचा छंद न्नकीच मैलाचा दगड ठरेल. येत्या वर्षात 500 घुबड पदकांचा संग्रह करण्याचा त्यांचा मानस आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!