Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

वाडीवर्‍हे येथे चारशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्यास कारावास

Share

नाशिक । प्रतिनिधी
वडलोपर्जीत शेत जमीनीच्या नोंदीच्या नक्कला देण्याच्या मोबदल्यात 400 रुपयांची लाच स्विकारताना लाचलूचपत प्रतिबंध विभगाने रंगेहाथ पकडलेल्या वाडीर्‍हे येथील तलाठ्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी 3 वर्ष कैद आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सुनतीलाल शिवाजी गावीत असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. गावित याने 14 ऑगस्ट 2014 रोजी शेतकर्‍याकडून 400 रुपयांची लाच घेतली होती. तक्रारदार शेतकरी यांची वडिलोपार्जित शेती असून फेरफार रजिस्टरच्या 6(ड) नोदींच्या नकला त्यांनी तलाठी गावित यांच्याकडे मागितल्या. त्यावेळी गावितने तक्रारदाराकडे 400 रुपयांची लाच मागितली.

त्यामुळे तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. विभागाने तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला होता. वाडिवर्‍हे येथील बाजार पंटागणावर गावितने तक्रारदाराकडून लाचेचे 400 रुपये घेतले. त्याच वेळी विभागाने त्यास रंगेहाथ पकडले त्यावर वाडीवर्‍हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांच्या न्यायालयात सुरू होता. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सादर केेलेले पुरावे ग्राह्य धरत त्यानुसार न्यायालयाने लाच घेतल्याप्रकरणी लाचलुतपत प्रतिबंधक कायद्यानुसार 3 वर्षेे कैद आणि दंड ठोठावण्यात आला आहे. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. विद्या जाधव यांनी युक्तीवाद केला.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!