Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

स्वाईन फ्लूचे पाच वर्षात 293 बळी

Share

नाशिक । जिल्ह्यात स्वाईन फ्लूने पुन्हा जोर पकडला आहे. जिल्ह्यात चालू वर्षी आतापर्यंत 323 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत ज्यात 35 मृत्यू नोंदले गेले आहेत. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यातील विशेषत: शहरी भाग सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. सर्वाधिक रुग्ण नाशिक महानगरपालिका हद्दीत आढळले आहेत. तर गेल्या पाच वर्षात स्वाईन फ्लूने एकुण 293 रूग्णांंचा बळी घेतला आहे.

सध्या पावसाळ्याचे अखेरचे दिवस सुरू असून वातावरण बदलाची प्रक्रिया सुरू आहे. सणासुदीचा हंगाम, आगामी हिवाळ्यामध्ये रूग्णांची संख्या आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने सज्जता केली आहे.
मागील पाच वर्षात स्वाईनफ्लूची आकडेवारी वाढती राहिली आहे. 2017 ला सर्वाधिक 529 स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह रूग्ण आढळले होते. तर यामध्ये 97 रूग्णांचा मृत्यू झाला होता. त्या खालोखाल 2015 मध्ये 508 रूग्ण आढळले तर 87 रूग्णांचा मृत्यू झाला होता. 2016 मध्े स्वाईन फ्लूचा जोर अचानक कमी झाला होता. परंतु आता पुन्हा यात वाढ होत असून गेली आठ महिन्यात जिल्ह्यात 323 रूग्ण आढळले असून 35 जणांना बळी गेला आहे.

आरोग्य विभागाने नागरीकांची जनजागृतीसाठी माहिती, प्रसारण आणि दळणवळण किंवा आयईसी उपक्रम यापूर्वीच विविध केंद्र आणि कार्यक्रमांद्वारे सुरू केले आहेत. आरोग्य विभागाने आतापर्यंत जिल्ह्यातील 1, 65,771 पेक्षा जास्त रुग्णांची एच 1 एन 1 विषाणूची तपासणी केली आहे. या रोगासाठी त्यांच्याकडे औषधांचा पुरेसा साठा असल्याचे विभागातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये टॉमी फ्लूच्या गोळ्यांचा पुरेसा साठा उपलब्ध झाला आहे, जे स्वाइन फ्लूच्या बाबतीत अत्यंत आवश्यक औषध आहे. खासगी वैद्यकीय चिकित्सकांनाही संशयित रूग्णांवर स्वाइन फ्लू आजाराने त्वरित उपचार करावेत, असे निर्र्देश देण्यात आले आहेत. लक्षणे दिसताच टॉमी फ्लूच्या गोळ्या 48 तासांच्या आत सुरू करण्याबाबतही खासगी डॉक्टरांनाही सुचना देण्यात आल्या आहेत.

आरोग्य विभागाने नागरिकांना गर्दीची ठिकाणे आणि मोठ्या संख्येने एकत्र येण्याचे टाळावे, एकमेकांना हातात हात देणे टाळावे, हात लावू नयेते, हात सतत स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पाच वर्षांतील आकडेवारी
वर्ष        पॉझिटिव्ह रूग्ण         मृत्यू
2015        508                     87
2016          16                      4
2017        529                    91
2018        493                    76
2019   (12 सप्टेंबर) 323        35

 

शहरी रुग्णांची स्थिती (2019)
परिसरातील        पॉझिटिव्ह रुग्ण       मृत्यू
नाशिक                    178               10
मालेगाव                     12                4
मनमाड                       7                 2
भगूर                           2                 0
देवळाली कॅम्प             4                  0
सिन्नर                         3                  0

टॉमीफ्लूचा पुरेसा साठा
आम्ही जास्त जोखीम असलेल्या रुग्णांना लसी देण्याचे ठरविले आहे, खासकरुन गर्भवती महिला आणि वृद्ध. सरकारी रुग्णालयात लसीकरण विनामूल्य उपलब्ध आहे. उच्च जोखमीच्या रूग्णांनी जवळच्या सरकारी रुग्णालयातून स्वत: ची लस घ्यावी. हिवाळा जवळ येणार आहे आणि वातावरण हळू हळू बदलत आहे. असे वातावरण पोषक असल्याने स्वाइन फ्लूने डोके वर काढेल अशी शक्यताआहे. टॅमी फ्लूच्या गोळ्यांचा साठासुद्धा आपल्याकडे पुरेसा आहे.
-दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, नाशिक

संशय वाटल्यास तात्काळ उपचार घ्या
हंगाम आता बदलणार आहे. जो विषाणुंना पोषक असतो. यामुळे नागरीकांनीे किरकोळ तापाकडे देखील दुर्लक्ष करू नये. जर त्यांना सर्दी, खोकला किंवा तापाचा संसर्ग झाला असेल तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांना भेटले पाहिजे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनाही रुग्णांना स्वाइन फ्लूची लक्षणे संशयास्पद आढळल्यास स्वाइन फ्लूवर उपचार करण्याच्या सुचना केल्या आहेत.
– डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्य चिकित्सक, नाशिक

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!