Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकचा जलतरणपटू श्रीपादला तीन सुवर्णपदकं; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Share

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक येथील श्रीपाद मनोज गायधनी या जलतरणपटूने गोंदिया येथे झालेल्या राज्यास्तरीय जलतरण स्पर्धेत तीन सुवर्णपदकं मिळवली आहेत. त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्रीपादच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याची नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.

श्रीपादचे शालेय शिक्षक स्वामी विवेकानंद शाळेत पूर्ण झाले. त्यानंतर त्याने भोसला मिलिटरी स्कूलमध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

त्यानंतर श्रीपादने भोसला मिलिटरी स्कूलमध्येच जलतरणाचे धडे प्राध्यापक घनश्याम कुवर आणि शंकर मारगुंडी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले.

दरम्यान, श्रीपाद स्पेनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करत असताना त्याचा अपघात झाला. अपघातात त्याचा स्पॅनल कॉडला गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान, सी ५ मनकाही त्याचा तुटला होता.

त्याच्यावर डॉ. देसाई आणि डॉ. अजय यावनकर यांनी उपचार केले. याचवेळी नाशिकमधील डॉ. पिंपरीकर यांच्या हॉस्पिटलमध्ये मुस्तफा टोपीवाला यांच्याकडे दाखल झाला. यादरम्यान टोपीवाला यांनी श्रीपादचा मनका आणि स्पॅनल कॉडवर झालेल्या शस्रक्रियेदरम्यान मार्गदर्शन केले. येथील दिपाली भोसले यांनी त्याच्याकडून सर्व प्रकारच्या फ़िजिओच्या ट्रेनिंग पूर्ण करून घेतल्या.

यानंतर श्रीपाद पुन्हा एकदा जलतरण स्पर्धेसाठी फिट झाला. राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने आपला सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरीकेली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!