स्वराज फाउंडेशचा ‘वॉक फॉर लाइफ’ च्या माध्यमातून अवयवदानाचा विश्वविक्रम

0

नाशिक : स्वराज फाउंडेशन व सह्याद्री हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने ‘वॉक फॉर लाइफ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक येथील विविध संस्था, महाविद्यालय, शाळा आणि शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज रोजी स्वराज फाउंडेशनच्या वतीने अवयवदान नोंदणीचा अनोखा विश्वविक्रम नोंदविला. संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत विश्वविक्रमाचा प्रमाणपत्र स्वराज फौंडेशनला प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी वंडर बुक ऑफ रेकॉर्डच्या मुख्य समन्वयक अमी छेडा यांच्या हस्ते स्वराज फाउंडेशनला विश्वविक्रम केल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. छेडा यांनी भविष्यातही हा विश्वविक्रम मोडून याच्यापुढे जाऊ अशी आशा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वराज फाऊंडेशनचे संस्थापक आकाश छाजेड यांनी केले. तसेच सूत्रसंचालन तन्मय जोगळेकर यांनी केले व आभार प्रदर्शन स्वराज फाऊंडेशनच्या संदेशदूत रंजीता शर्मा यांनी केले. तसेच या कार्यक्रमामध्ये नुपुर डान्स कॅडमी, सह्याद्री हॉस्पिटलच्या परिचारकांनी अवयवदान जनजागृती करत नाटिका सादर केली.

विशेष म्हणजे या वॉक फॉर लाईफ या रॅलीचा मार्गक्रमण ब्लाइंड असोसिएशनच्या मुलांनी केले. सकाळी ७ वा अतिशय थंडीच्या वातावरणामध्ये ‘वॉक फॉर लाईफ’ या उपक्रमाला कॉलेज रोड येथील डॉन बॉस्को शाळेपासून सुरुवात झाली. या वॉकमध्ये डी आय डी टी कॉलेज, जी डी सावंत कॉलेज, नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय, सॅव्ही कॉलेज, ब्लाइंड ऑर्गनायझेशन, बीव्हीजी इंडिया लिमिटेड, रोटरी क्लब ऑफ नाशिक ईस्ट, नामको चैरिटेबल हॉस्पिटल, आकार फाउंडेशन, समिज्ञा फाउंडेशन, दिव्य फाउंडेशन, शिवताल वाद्य पथक, आदि संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.

एका अनोख्या पद्धतीने हा कार्यक्रम करण्यात आला. यामध्ये विविध संस्थांनी अवयवदानाच्या जनजागृती करत विशेष फलक व देखावे सादर करण्यात आले. आत्तापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांपैकी या अवयवदान जनजागृतीच्या कार्यक्रमाला सर्वात मोठा कार्यक्रम म्हणून नाशिकमध्ये नोंदविण्यात आला. यापुढे जाऊन स्वराज फाउंडेशन अवयवदान जनजागृती मध्ये गिनीज रिकॉर्ड करेल अशी आशा संस्थापक आकाश छाजेड यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास शहराचे आमदार देवयानी फरांदे, सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टर संजय चावला, डॉक्टर विभूते, नगरसेविका समीना मेमन, नगरसेविका आशा तडवी, नगरसेवक योगेश हिरे, बीवायके कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राम कुलकर्णी, प्रीतिश दादा छाजेड, डॉक्टर मनीष पाठक, आय एम ए चे अध्यक्ष अवेश पलोड, सिनेअभिनेते अरमान ताहील, बाळासाहेब कंक्राळे, पुष्कर जोशी, मनोज केंगे, विनोद बोधले, शंकर कदम, राहुल बोडके, विनीत देवरे, महेश पठाडे या कार्यक्रमाचे आयोजन स्वराज फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

*