Type to search

सुरगाणा : पंगारबारीला भीषण पाणी टंचाईने नागरिक त्रस्त

Breaking News नाशिक मुख्य बातम्या राजकीय

सुरगाणा : पंगारबारीला भीषण पाणी टंचाईने नागरिक त्रस्त

Share

हतगड । लक्ष्मण पवार : सुरगाणा तालुक्यातील पंगारबारी येथे विहिरींनी तळ गाठला असल्याने पाण्याच्या टाकी मध्ये पाण्याचा एक ही थेंब नसल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

या गावातील महिला असो वा पुरुष हंडा भर पाण्यासाठी दिवस व रात्रभर जागरण करून लहान लहान झरे खोदुन एक ते दिड किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागत आहे .या पाणी टंचाई मुळे पाण्याच्या शोधात आपला काम धंद्या नागरिक विसरून गेले आहेत.

वर्षामागून वर्ष गेले निवडून कोणी बी येवोना, पाण्यासाठी वणवण आमची काही केल्या थांबना, धो धो पाणी पावसात जात पाणी जमिनीत काही मुरना, गावोगावी आयबहिनीचे हाल ते कोणाला बी दिसना, नका करू राजकारण नुसतं समाजकारण कुणालाच नाही सूचना, पाणी अडवायला च हवं कसं कुणाला कळ ना, असे नागरिकांच्या मनातून वाक्य फुटत आहे.

तरी देखील या नागरिकांच्या पाणी टंचाई भावनेकडे लोकप्रतिनिधी व सबंधित स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असून त्यांच्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी नाकाम ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी या लोकप्रतिनिधी व सबंधित स्थानिक प्रशासनाचा तीव्र निषेध करीत नाराजी व्यक्त केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!