Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सुरगाणा : वॉटर सप्लायचे उदघाटन थांबल्यामुळे भरपावसाळ्यात डोक्यावरून पाण्याची वाहतूक

Share

नाशिक । सुरगाणा तालुक्यातील आंबोडा ग्रामपंचायतीमधील खोकरविहीर या गावात 2013 साली सुरू केलेल्या व 2014 मध्ये पूर्ण झालेल्या पाणी योजना फक्त बटण दाबण्याच्या प्रतीक्षेत आहे. शासकीय अधिकार्‍यांच्या असहकार्यामुळे ही योजना सुरू होत नसल्याने आदिवासी बांधवांना भरपावसाळ्यात डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.

खोकरविहीर येथे पाच वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून पाणी योजना राबविण्यात आली. या योजनेत विहिरीचे खोदकाम, पाणी पुरवठ्यासाठी पाइपलाइन, पंप हाउस, पाण्याची टाकी व पाच ठिकाणी नळांचे काम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे बांधलेल्या पंप हाउसला दरवाजा न बसविल्याने यातील स्टार्टरची दोन वर्षांपूर्वी चोरी झाली. ही पाणी योजना लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी खोकरविहीरचे सामाजिक कार्यकर्ते मनोहर जाधव यांनी खासदार डॉ. भारती पवार, गटविकास अधिकारी केशव गड्डापोड, तहसीलदार, पंचायत समिती सभापती यांच्याकडे केली होती.

या मागणीनंतर ग्रामविकास अधिकारी राजेंद्र चौधरी यांनी वेळात वेळ काढून भेट देत पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली. पाणी योजनेतील त्रुटी दूर करून ती लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले. ही योजना सुरू करण्यात अडथळा आणणार्‍या झारीतील शुक्राचार्यांना धडा शिकविण्याचा इशारा मनोहर जाधव, हिरामण महाले, राजेंद्र निकुळे, नामदेव पाडवी, देवीदास पाडवी, यशवंत जाधव, योगेश जाधव, विलास जाधव, शंकर महाले यांनी दिला आहे.

झगडपाडाही झगडतोय पाण्यासाठी
आंबोडा ग्रामपंचायती अंतर्गत येणार्‍या झगडपाडा गावात विहीर आहे, तीला पाणी आहे, पाणी पुरवठा योजना आहे, वीज आहे मात्र फक्त बटन दाबण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे तेच गायब आहे. त्यामुळे गावच्या लोकप्रतिनिधींच्या घरातील महिलांनाही डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे. अशीच गत जवळीलच खडकी गावाचीसुद्धा आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!