Type to search

नाशिक

सुरगाणा येथील युवकाचे सिनेस्टाइल अपहरण

Share

नाशिक । सुरगाणा तालुक्यातील पांगारणे जवळील गोंदुण येथील प्रकाश नानू गावित (29) या युवकाचे अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान पांगारणे येथील त्रिफुली वरून अपहरण करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलीस ठाण्यात युवकाने फिर्याद दिली असून पोलिसांनी अपहरण करणार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, प्रकाश गावित हा अठ्ठावीस ऑगस्ट रोजी ऊंबरठाण येथून आठ वाजेच्या दरम्यान दुचाकी (क्र- जी.जे- 21, ए.एल- 9456 ) वरुन गोंदुणे येथे जात असतांना पांगारणे येथील त्रिफुलीवर एका तवेरा गाडीत बसलेल्या आठ अज्ञात इसमांनी प्रकाशला रस्त्यात थांबविले व म्हटले की, आम्ही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आहोत, तु दमणची दारू गैरमार्गाने वाहतूक करतोस चल लगेच गाडीत बस असे सांगितले. प्रकाश गाडीत बसत नसतांना जबरदस्तीने गाडीत बसवून ऊंबरठाण मार्गे सुर्यगड येथे आणुन बेदम मारहाण केली.

सुरगाणा येथे घेऊन आले तदनंतर प्रकाशचा भाऊ दिनेश गावित यास दुरध्वनी करुन तुझा भाऊ आमच्या ताब्यात आहे. तुम्हाला जिवंत पाहिजे असेल तर आताच्या आताच दोन लाख रुपये सुरगाणा येथील पेट्रोल पंपाजवळ घेऊन या ,असे सांगितले. वारंवार भ्रमणध्वनी करुन धमकी देत होते.

रात्री गावातील नागरिकांकडे शे, पाचशे, हजार, असे पै पै जमवुन रात्रभर जागून साठ हजार रुपये जमा करुन सुरगाणा येथे पहाटे चार वाजेच्या सुमारास दिनेश याने आणुन दिले. याधील एक युवकाला प्रकाश ओळखत असल्याने केशव महाले रा. करंजाळी असे अपहरणकर्ताचे नाव असुन त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तो एका टोळीत काम करीत असल्याचे बोलले जात आहे.

तालुक्यात गुंडगिरी फोफावली असुन पोलिसांपुढे मुसक्या आवळण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. अशा गुंडावर तात्काळ कारवाई करुन बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!