Type to search

Breaking News आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

सुरगाणा : एकविस वर्षाची रंजना सांभाळणार करंजूल (क) ग्रामपंचायतीचा कारभार

Share

सुरगाणा । रतन चौधरी :
असे म्हटले जाते” जिच्या हाती पाळणाची दोरी ती जगाचे उद्धारी” एक पुरुष शिकला तर एकटा शहाणा होतो, मात्र एक स्त्री शिकली तर संपुर्ण कुटूंब शहाण होत. अशीच एक गुजरातच्या सिमेवरील अतिदुर्गम भागातील जेमतेम तीनशे लोकवस्तीचे गाव करंजुल (सु) गावातील कु. रंजना चिंतामण वार्डे (वय २१ ) हिच्या ध्यानी मनीही नसतांना अडीच वर्षांच्या ठरलेल्या सरपंच बदलाच्या कालावधी करीता झालेल्या सरपंच निवडणुकीत वरमालाच्या आधीच गळ्यात सरपंच पदाची माळ पडली आहे.

त्यामुळे करंजुल (क) या ग्रामपंचायतीच्या कारभारासह गांडोळमाळ, वडमाळ, बोरीचागावठा येथील गावगाडा हाकण्याची जबाबदारी नवनिर्वाचित सरपंच तरुणी रंजना हिच्याकडे आली आहे. तिच्या या झालेल्या निवडी बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. वडील शेतमजूर अल्पशिक्षित आई मजूरी व घरकाम करणारी, घरात राजकारणाचे वातावरणही नाही.

रंजनाने गतवर्षीच सुरगाणा येथील नुतन विद्यामंदिर येथून बारावीचे शिक्षण घेतले असून बी.ए. च्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला आहे. तिला सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असुन अशिक्षित आदिवासी महिलांना आरोग्य, शिक्षण, बँकेचे व्यवहार, बचतगटांना मदत करणे या कामांबद्दल माहिती देत असते.

महिलांशी सतत संपर्कात राहून तिला हे यश मिळाले आहे. सर्वच ग्रामस्थांनी तिचा सत्कार केला आहे. या निवडणुक प्रकियेकामी निवडणूक अधिकारी वि.टी.शिंदे, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत, विस्तार अधिकारी के.के, गायकवाड आदिंनी काम पाहिले. सत्कार करतांना भागवत राठोड, बबन पवार, परशराम लहरे, बाळू लहरे, जयराम वार्डे, रमेश वार्डे, लक्ष्मण राठोड, यादव भोये, विजय राठोड, भास्कर लहरे, सुरेश वार्डे, धवळू लहरे, मधू पवार, संजू पवार, नामदेव वार्डे, भगवान भोये, मुरलीधर राठोड, तुषार चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, प्रकाश वार्डे, लक्ष्मण पवार, मनोहर वाघमारे, हरी लहरे, भास्कर भडांगे, जयराम राठोड, मोतीराम राठोड आदिंनी अभिनंदन केले आहे.

माझ्यावर ग्रामस्थांनी विश्वास टाकून अल्पवयातच खुप मोठी जबाबदारी सोपविली आहे. यातून मला खूप शिकायला मिळणार आहे. माझ्यावर टाकलेल्या विश्वासाहर्तेला तडा जाऊ देणार नाही. विशेषतः महिला सबलीकरण, सक्षमीकरण करुन बचतगट स्थापन करुन महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याकरीता विशेष प्रयत्न करणार आहे, तसेच बालविवाह रोखण्याकरीता रस्ता, वीज, आरोग्य ,शिक्षण, दळणवळण, पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे.
-रंजना वार्डे, सरपंच, करंजुल (क)

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!