मारहाण करणाऱ्या महिलांवर ‘ऍट्रॉसिटी’ दाखल करावा यासाठी निवेदन

0

हतगड (वार्ताहर) : सुरगाणा ग्रामीण रुग्णालय येथील १०८ रुग्णवाहिका चालक दिगंबर पांडुरंग गावित रा पळसन हे दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता सदर रुग्णवाहिकेतून रुग्णास नाशिक रुग्णालयात घेवून जात असतांना लखमापुर फाटया जवळ MH १५ EB ९०८१ वर्णा ह्या गाडीतील काही महिलांनी रुग्णवाहिका अडवून चालक व त्यातील रुग्णांच्या नातेवाईक यास शिवीगाळ करून चालकाच्या डोक्यावर काचेची बाटली फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

याबाबत संबंधित महिला विरोधात वणी पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.परंतु मारहाण करणाऱ्या महिलांना अट्रोसिटी अक्ट नुसार गुन्हा दाखल करावा व आरोपींना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

या सबंधी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान युवा समिती सुरगाणा यांच्या तर्फे सुरगाणा पोलिस निरीक्षक मा.सुनील खरे ,बोरगांव पोलिस दुरक्षेत्र मा.गोतुर्ने ,गवळी यांना निवेदन देण्यात आले. त्या प्रसंगी श्री. दादाराव जाधव, गणेश जाधव, लक्ष्मण बागुल, दिनेश जाधव, आनंद पडवळ, जिवन चौधरी आदि उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*