Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सुरगाणा : पाण्याच्या शोधार्थ निघालेली गरोदर महिला पाय घसरून जखमी

Share

हतगड । लक्ष्मण पवार : सुरगाणा तालुक्यातील अनेक गावांतील विहिरी कोरड्याठाक झाल्या असून यामुळे महिलांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते आहे. तालुक्यातील पळशेत येथील मालती चिंतामण पाडवी ही महिला हंडाभर पाण्यासाठी विहिरीवर गेली असताना अचानक पाय घसरून पडल्याने जखमी झाली. अशातच हि महिला गरोदर असल्याने वेळीच उपचार झाल्याने थोडक्यात बचावली आहे.

सध्या राज्यात दुष्काळाचे सावट असून महिलांची दोन तीन किमी पायपीट होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची वाणवा आहे. सार्वजनिक विहीर कोरड्या झाल्या असुन हंडाभर पाण्यासाठी राञभर जागरण करावे लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.

अशावेळी पाळशेत येथील गरोदर महिला पाण्याच्या शोधार्थ निघाली असतांना डोंगरावरून पाय घसरून पंधरा ते विस फुट खाली सरकत आली. महिलेने आरडाओरड केल्यानंतर स्थानिक गुराख्यांनी आजुबाजुच्या शेतकऱ्यांची मदत घेऊन ग्रामीण रुग्णालय सुरगाणा येथे उपचारासाठी दाखल केले. तात्काळ उपचार मिळाल्याने महिला बचावली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!