Type to search

पेठ तालुका दुष्काळ
पाण्यासाठी दाही दिशा
विहिरी कोरड्याठाक
Breaking News नाशिक मुख्य बातम्या

PhotoGallery : सुरगाणा-पेठ तालुक्यात पाणी प्रश्न बिकट; महिलांसह पुरुषांचीही कसरत

Share

हतगड । लक्ष्मण पवार

सुरगाणा पेठ तालुक्यात दुष्काळाचे भीषण वास्तव समोर येत आहे. आदिवासी दुष्काळात होरपळू लागले आहेत. सुरगाणा तालुका धरणांचा तुटवडा असून पाण्याची बिकट परिस्थिती गावोगावी पाहावयास मिळत आहे. बहुतेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू असला तरीही अनेक गावांना पाण्याचा प्रश्न असल्याने पाणी मिळविण्यासाठी महिलांना दिवसभर पायपीट करावी लागते.

भर उन्हात व रात्री अपरात्री पाण्यासाठी प्रसंगी जीव धोक्यात घालून मैलोनमैल जाऊन पाणी आणावे लागत आहे.एवढे करून ही पाण्याची गरज भागतेच असे शास्वत नसेल त्यावरून दुष्काळाची तीव्रता अधिक स्पष्ट होते. रोजगाराची भ्रांत असल्याने सातत्याने मंजुरीसाठी भटकंती पाचवीला पुजलेली मजुरी अभावी गावात आलेल्या तरुणांना ही टंचाईचा झळा तीव्रतेने सोसावा लागत आहे.

पाणी टंचाई चा सामना नागरिकांसह जनावरांनाही करावा लागत आहे. विहीरी आणि बोरवेलने अनेक गावांना केव्हाच अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच बरोबर पाझर तलाव ही अखेरचे श्वास मोजत आहेत.जेमतेम पाणी असणाऱ्या विहिरीतील सबंधित मालक भरू देत नाही. अवैध रित्या पाणी विकले जाते .त्यामुळे सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. या पाणी टंचाई ला सुरगाणा पेठ तालुक्यातील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

भर उन्हात पायपीट करून महिला पाणी आणतात काही गावांना टँकर येत नसल्याने कोणी पाणी देता का पाणी म्हणण्याची वेळ काही गावावर येत आहे. तर काही गावांना सेवा भावी संस्था द्वारे पाणी पुरवठा करीत आहेत. रोज टँकर येते त्यात गावाला पुरेसा पाणी पुरत नाही. तालुक्यात ग्रामपंचायत ची विहिरी आहेत.परंतु त्यांनी तळ गाठल्याने महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. बहुतेक गावांना पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजना राबवल्या जात नसल्याने प्रश्न गंभीर झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

काही गावांना टाकी पाईपलाईन आहेत. परंतु ढिसाळ नियोजन अभावी ग्रामपंचायतीने आजपर्यंत पाण्याचे योग्य नियोजन जमले नाही. यामुळे पाण्याची टंचाई महिना भरापासून भासू लागली आहे. सुरगाणा तालुक्यातील ४० ते ४५ वाड्यावस्त्यांवर शासकीय टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने टँकर चे पाणी मागणी वाढू लागली आहे.

नागरिकांना हंडा भर पाण्यासाठी पाण्याची वाट पहावी लागत आहे.ग्रामीण भागात पाण्यासाठी टँकरची कामधंदे सोडून वाट पहावी लागत आहे. तालुक्यात यंदा गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होत आहे. मात्र पाणी टंचाई निर्माण होण्याचे कारणीभूत असणाऱ्या अपूर्ण पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे तालुक्यात अनेक गावांना राष्ट्रीय पेयजल योजना,भारत निर्माण योजना, जल स्वराज्य, आदी योजना या लाखो रुपये निधी खर्च करून त्या अनेक गावांना अपुऱ्या अवस्थेत काही कुचकामी असल्याने त्या वापरात येत नाहीत.

अशा योजना भ्रष्टाचाराचे कुरण बनल्या आहेत. त्यामुळे योजनांची चौकशी होणे गरजेचे आहे, असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. तसेच तालुक्यात लहान मोठे पाझर तलाव आहेत. परंतु ते आजच्या स्थितीला कोरडेठाक झाले आहेत. असे पाझर तलाव ग्रामपंचायत, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसील आदींनी जागेवर जाऊन पाहणी करून जे पाझर तलाव गाळ काढणे गरजचे आहेत.

असे पाझर तलाव गावाच्या नावासहित प्रस्ताव तात्काळ पुढे मंजुरी साठी पाठविण्यात येऊन गाळ काढण्यात यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. त्यामुळे पुढे अशा भीषण पाणी टंचाईला नागरिकांना सामना करावा लागणार नाही, असे नागरिकांमध्ये चर्चा सत्र सुरू आहे. शासनाने यावर गंभीर पणे दखल घ्यावी अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!