Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : सुरगाणा | खासदार भारती पवार जेव्हा अधिकाऱ्यांना खडसावतात…

Share

लक्ष्मण पवार : सुरगाणा तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करतांना कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना खासदार भारतीताई पवार यांनी चांगलेच खडसावले.

दरम्यान जिल्ह्याभरात परतीच्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार भारतीताई पवार या सुरगाणा तालुक्यात पिकांची पाहणी दौरा केला. यावेळी स्थानिक कृषी अधिकाऱ्यांनी शेतीचे पंचनाव व्यवस्थित न केल्याने फोटो काढून जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्याचे आदेश त्यांनी यावेळी सहकार्यांना दिले. या कृषी अधिकाऱ्यांनी पिकांची योग्य ते पंचनामे न करता ढोबळ पंचनामे करून अचूक नमुना न वापरता जुने पंचनाम्याचा न्हाऊन वापरण्यात आल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.

सुरगाणा : खासदार भारती पवार जेव्हा अधिकाऱ्यांना खडसावतात…

सुरगाणा : खासदार भारती पवार जेव्हा अधिकाऱ्यांना खडसावतात… सुरगाणा तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करतांना कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना खासदार भारतीताई पवार यांनी चांगलेच खडसावले.

Posted by Deshdoot on Monday, 4 November 2019

हतगड-सुरगाणा तालुक्यात खासदार भारती ताई पवार यांनी शेती नुकसान ग्रस्त दौरा केला. त्यावेळी या परिसरात १०० टक्के नुकसान झाल्याचे आढळून आले. परंतु अधिकाऱ्यांकडून कमी नुकसान दाखवली. यावेळी पवार यांनी अधिकाऱ्यांना खडसावंत सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच एकही शेतकरी वंचित राहिला नाही पाहिजे व पंचनामे चुकीची पद्धत वापरू नका असे देखील सांगितले

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!