Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

हतगड : उन्हाची काहिली अन जनावरांचे पाणी पिण्याचे हाल

Share

हतगड । लक्ष्मण पवार : मान्सूनला काही दिवस शिल्लक असतांना सुरगाणा तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. नागरिकांना पाण्याची वानवा असताना जनावरांनाही पिण्यासाठी हाल सोसावे लागत आहेत.

दरम्यान झगडपाडा ते भिवतास पर्यंत एकही केटी बंधारा व कोल्हापूर बंधारा नाही. त्यामुळे पाण्याची साठवणकरण्याकरिता कोणतेही साधन उपलब्ध नाही. होळी पासून जनावरांना पाणी पिण्यासाठी व शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची सोय नाही म्हणून शेतकऱ्याला केटी बंधार्‍याची गरज आहे.

कोल्हापूर बंधारे हे वीस वर्षापूर्वी बांधले गेले होते पण ते नदीच्या पुरामुळे वाहून गेले. यंदाच्या उन्हाळ्यात नदीचा घसा कोरडा झाला असून यामुळे जनावरांना पाण्याचा थेंब नाही. म्हणून जनावरांना पाणी प्यायला मिळत नाही जनावरांचे हाल होत आहे प्यायला पाणी मिळत नाही शेतकरी काय करणार पाणी कुठे शोधणार याची काळजी शेतकऱ्याला पडलेली आहे.

त्यामुळे चार ते पाच किलोमीटर लांब जाऊन शेतकर्‍यांना पाणी आणावे लागत आहे. बैलांसाठी ४० ते ६० लिटर पाणी रोज आणायला शेतकरी खूप हाल सोसत आहे. झगडपाडा ते भिवतास पर्यंत तीन ते चार केटी मंजूर करून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!