सुरगाणा येथे सहा लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

0

नाशिक । प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध मद्यसाठा घेऊन दाखल झालेल्या मारुती कारवर छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने 5 लाख, 62 हजार, 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुरगाणा तालुक्यातील काठीपाडा परिसरात ही कारवाई करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीत अवैध मद्याचा वापर रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाला आहे. रविवारी (दि.14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ड्राय डे असल्याने सर्व मद्यदुकाने बंद होती. या पार्श्वभूमीवर देशी, विदेशी अवैध मद्याची विक्रीसाठी जिल्ह्यात वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे यांना मिळाली होती.

त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एम. बी. चव्हाण, खांदवे, दुय्यम निरीक्षक देवदत्त पोटे, निरी पंडित जाधव, कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, विठ्ठल हाके, महेश सातपुते, संजय सोनवणे, मच्छिंद्र आहिरे, अमन तडवी यांच्या पथकाने सुरगाणा – अंबरठाण रोवर काठीपाडा शिवारात रविवारी रात्री सापळा रचला होता.

दरम्यान, संशयित मारुती कार (क्र. जीजे 15. सीए 7802) ही परिसरात येताच पथकाने छापा टाकला. परंतु अंधाराचा फायदा घेत संशयित चालक पळून गेला. पथकाने कारची तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारूच्या 180 मि. ली. च्या 1920 बाटल्या (40 बॉक्स), देशी संत्रा दारूच्या 1200 बाटल्या (25 बॉक्स), मारुती कार असा 5 लाख, 62 हजार, 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास निरीक्षक चव्हाण करत आहेत.

LEAVE A REPLY

*