Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पोलीस अधीक्षकांची जिल्ह्यातील बँक अधिकाऱ्यांसोबत बैठक; बँका/ए.टी.एम.ची ‘अशी’ घ्या सुरक्षा

Share

नाशिक : शहरातील मुथूट फायनान्स व जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील निंबोळ गावातील विजया बँकेवर पडलेल्या दरोडा या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बँका/ए.टी.एम.च्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मा.पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी आज रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील बँकांचे अधिका-यांची बैठक घेतली.

सदर बैठकीस जिल्ह्यातील विविध बँकांचे विभागीय व्यवस्थापक व शाखा व्यवस्थापकांसह बँकांचे अधिकारी व कर्मचारीउपस्थित होते. यावेळी मा.पोलीस अधीक्षक यांनी आर.बी.आय.च्या नियमांनुसार बँक प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घ्यावयाची सतर्कता याबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या. तसेच बँक व ए.टी.एम. मध्ये घडणारे गुन्हे व त्यावरील उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

दरम्यान या बैठकीत जिल्ह्यातील बँक व्यवस्थापक, कर्मचारी यांना सुरक्षिततेबाबत पुढील सूचना करण्यात आल्या

(१) सर्व बँक/एटीएम मध्ये अत्याधुनिक सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसवुन घ्यावे, तसेच एक अतिरिक्त कॅमेरा हा
बँकेच्या बाहेरील बाजुस बसवुन बँक व पसिरातील रस्ता व आजुबाजूचा परिसर दिसेल असा लावावा. बँकांचे बाहेर
रात्रीचे वेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था/लख्ख प्रकाश ठेवण्याबाबत अवलोकन करावे.

(२) बँक/एटीएमच्या मुख्य प्रवेशव्दारावर सशस्त्र सुरक्षा रक्षक तैनात ठेवावे, (३) सुरक्षेच्या अनुषंगाने अत्याधुनिक सिक्युरिटी अलार्म
बसविण्यात यावे. बँकांचे लॉकर्स हे नामांकित कंपनीचे बसवुन त्याचा योग्य रितीने वापर करण्यात यावा.

(४) बँक/एटीएम मध्ये नजरेस येईल अशा ठिकाणी ठळक अक्षरात हेल्पलाईन क्रमांक व संबंधित पोलीस ठाण्याचा दूरध्वनी
क्रमांक नमुद करावा, जेणेकरून संकटकाळी संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधता येईल.

(५) बँकांच्या प्रवेशव्दाराला DFMD युनिट बसवुन घ्यावे, (६) बँकांचे रोख रकमेची वाहतुक अथवा ए.टी.एम.मध्ये कॅश
लोडींगसाठी जातांना सुरक्षित वाहन वापरावे, वाहनांना गँस सेवा बसविण्यात यावी, सशस्त्र सुरक्षारक्षक नेमण्यात
यावा, तसेच जास्त रक्कम असल्यास पोलीस बंदोबस्त मागवुन घ्यावा.

(७) बँकेत येणारे जाणारे लोकांच्या नोंदीसाठी ग्राहक नोंदवही ठेवावी, तसेच बँक/एटीएम मध्ये हेल्मेट किंवा मास्क घालुन प्रवेश करणा-यांना मनाई करावी. संशयास्पद हालचाली दिसुन आल्यास पोलीसांशी तात्काळ संपर्क साधावा.

(८) बँकेतुन अथवा एटीएम मधुन कॅश काढतांना नजर ठेवुन बाहेर असलेले साथीदारांना सांगुन बॅग लिफ्टिंग, ए.टी.एम.फसवणुक, बँकेचा प्रतिनिधी बोलतोय तुमचा कार्डनंबर, पिनकोड व सी.एस.व्ही. द्या असे सांगुन फसवणुक करणारे, इत्यादी गुन्हयांबाबत आपल्या ग्राहकांमध्ये जनजागृती करावी.

(९) बँकेत प्रवेश करणारे ग्राहकांची परिपुर्ण माहिती घ्यावी तसेच खात्यास संलग्न असलेला मोबाईल नंबर ग्राहकाचाच आहे काय याबाबत योग्य ती खात्री करावी.

(१०) ए.टी.एम.सेंटरवर २४ तास सशस्त्र सुरक्षा रक्षक तैनात ठेवावे, अत्याधुनिक दर्जाचे सी.सी.टी.व्ही. व अलार्म सिस्टीम अद्ययावत ठेवावी व बँक सुरक्षा अधिकारी यांनी वेळोवेळी फेरआढावा घ्यावा.

यावेळी नाशिक ग्रामीण जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अशोक करपे, पोउनि संदिप कहाळे, एस.बी.आय.बँकेचे विभागीय व्यवस्थापक श्री. दुर्गेश दुबे, सुरक्षा अधिकारी श्री.संजय जोशी, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक श्री.सुनिल बरू, एन.डी.सी.सी.बँकेचे श्री. के.एम.जाधव, आय.सी.आय.सी.आय बँकेचे श्री. विकी भगत, कॅनरा बँकेचे श्रीअमोल जेजुरकर यांचेसह इतर बँकांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील बँक परिसरात दैनंदिन पोलीसांची पेट्रोलिंग वाढविण्यात आली असुन साध्या वेशातील पोलिस तैनात ठेवण्यात येणार आहे. नागरीकांनी भयभीत न होता सतर्क रहावे, बँक व पोलीस प्रशासनास सहाकार्य करण्याचे आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!