Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

उन्हाळा स्पेशल : उन्हाळी सुट्टीत पर्यटकांनी गजबजली गोदानगरी

Share

नाशिक | उन्हाळी सुट्टीत पर्यटनाची पर्वणी साधण्यासाठी अनेक पर्यटक नाशकात दाखल झाले आहे.पर्यटकांच्या गर्दीने नाशिकमधील धार्मिकनगरी अशी ख्याती असलेला पंचवटी परिसर गजबला आहे. धार्मिक पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमुळे कपालेश्वर, सीतागुंफा, रामकुंड, काळाराम मंदिर आणि तपोवन परिसर गर्दीने फुलून गेला आहे. सुट्टीत पर्यटन करण्यासाठी पर्यटक आणि देवदर्शनासाठी भाविकही पंचवटीसह सोमेश्वर, बालाजी मदिर येथे दाखल होत आहेत. या गर्दीने धार्मिकस्थळे गजबजली आहेत.

पर्यटन आणि दर्शन घेण्यासाठी सहकटुंब निघालेले अनेक पर्यटक व भाविक पंचवटीत येत आहेत. त्यांच्या गर्दीमुळे रामकुंड परिसरासह पंचवटीतील सर्वच मंदिरांचे परिसर फुलून जात आहेत. रामकुंडावरही गर्दी होत आहे. कपालेश्वर मंदिरात अभिषेक करण्यासाठी भाविक जात असून तेथून काळाराम मंदिर आणि सीतागुंफा येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागत आहे.

भाविक आणि पर्यटकांच्या वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे गौरी पटांगण, जुन्या भाजीबाजाराची जागा, म्हसोबा पटांगण, रामकुंड पार्किग आदी मैदाने भरून गेली आहेत. तपोवनातील कपिला संगमाच्या रम्य ठिकाणी आणि रामसृष्टी उद्यानात फेरफटका मारण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहे. कपिला संगमावरील खडक आणि त्याचा परिसर, लोखंडी पुलावरून दुसर्‍या बाजूला जाण्याची कसरत करताना पर्यटक दिसत असून केवडीबन येथील म्हसोबा मंंदीरातही भाविक गर्दी करीत आहे.

उन्हाचा तडाखा असला तरीही पंचवटी परिसरात पर्यटकांची संख्या वाढलेली आहे. या पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगार मिळत आहे.

गाईड आकारताय जादा पैसे
विविध ठिकाणाहून आलेल्या पर्यटकांना शहरातील पर्यटन ठिक़ाणे व धार्मिकस्थळांची माहीती देण्यासाठी गाईडस काम करतात. हे गाईडस पर्यटकांकडून जादा पैसे आकारतात. तसेच जादा पैसे घेऊनही अर्धवट तोंडी माहिती देत पर्यटकांना 2 तासात अख्खे नाशिक फिरवून आणतात. 2 ते 4 हजार रूपयांपर्यंत हे गाईड पैसे घेत आहे.

येथून येतात पर्यटक
तामिळनाडू, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, विदिशा, गुजरात, वापी, इंदूर, नागपूर, सोलापूर, कर्नाटक यासह हुबळी व कोल्हापूर येथून शेकडो पर्यटक येतात.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!