Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

कूल डेस्टिनेशनला नाशिककरांची पसंती

Share

नाशिक । प्रतिनिधी
उन्हाळी सुट्यांची पर्वणी साधत नाशिककरांनी पर्यटनाचे बेत आखले आहेत. देशातील ‘कूल डेस्टिनेशन’ला पर्यटकांची अधिक पसंती मिळत असून त्यामध्ये सिमला, नैनीताल, मसुरी, दार्जिंलिंग, डलहौसी व डेहराडून अशा ठिकाणी सुटी घालविण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान, नंदनवन समजले जाणारे काश्मीरममध्ये पर्यटकांचा ओघ घटला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे काश्मीर ही पर्यटकांची सेकंड चॉईस ठरत असल्याचे पहायला मिळते.

महाविद्यालये, शाळांना सुट्या लागल्या असून फॅमिलीसह हा हंगाम एन्जॉय करण्यासाठी नाशिककरांकडून देश व परदेशात जाण्याचे प्लॅनिंग केले जात आहे. सुटीचा हंगाम कॅश करण्यासाठी ट्रॅव्हल, टुरिझम कंपन्यां सरसावल्या असून, पर्यटकांना आकर्षक पॅकेज दिले जात आहे. पुढील एक महिन्याचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यात देशातील थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटकांची विशेष पसंती मिळत आहे.

हिमालय पर्वत रांगाच्या कुशीतील मनाली, कुलू, नैनीताल, सिमला तसेच, सिक्कीम, दार्जिलिंग, गंगटोक, डेहराडून आदी ठिकाणी भटकंतीकडे पर्यटकांंची पाऊले वळत आहेत. तसेच, दक्षिण भारतात उटी, मसुरी या ठिकाणांना नाशिककरांची पसंती मिळत आहे. विदेशातील थंड हवेच्या ठिकाणांचे बुकिंग फुल्ल झाल्याचे पहायला मिळते.

त्यामध्ये हिमालयाच्या कुशीत वसलेला नेपाळ व भूतान हे देश तसेच, युरोप, मलेशिया या देशांना भ्रमंतीसाठी प्राधान्य दिले जात आहे. भारताचे नंदनवन अशी ओळख असलेल्या काश्मीरकडे पर्यटकांनी मात्र, पाठ फिरवल्याचे चित्र आहे. पुलवाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे पर्यटक या ठिकाणी जाण्याचे धाडस टाळत असल्याचे, ट्रॅव्हल्स व टुरिझम कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे.

धार्मिक पर्यटन
वैष्णोदेवी, बद्रीनाथ, केदारनाथ, हरिद्वार, हृषिकेश, वाराणसी, अजमेर, अमृतसर आदी धार्मिक पर्यटनाकडे नाशिककरांचा कौल आहे.

देश व विदेशात पर्यटनाला नाशिककरांची पसंती मिळत आहे. कंपनीकडून पर्यटकांना घसघशीत सूट दिली जात आहे. बुकिंग हाऊसफुल्ल होत आहे.
– ब्रिजमोहन चौधरी, संचालक , ब्रिजमोहन टुरिझम प्रा.लि

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!