Type to search

क्रीडा नाशिक

देवळाली कॅम्प : शालेय विद्यार्थ्यां उन्हाळी फुटबॉल शिबिराला सुरवात

Share

देवळाली कॅम्प प्रतिनिधी : नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व फ़ुटबॉल क्लब देवळाली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे शालेय विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक १५ एप्रिल ते ५ मे पर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे क्लबचे अध्यक्ष रतनजी चावला यांनी आवाहन केले.

नाशिक जिल्हा क्रीडा अधीकारी कार्यालय व देवळाली कॅम्प येथे फ़ुटबॉल क्लब देवळाली यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले असून फुटबॉल शिबिरामध्ये खेळाच्या नवीन नियमांचे ज्ञान आणि नवीन साहित्याच्या साहाय्याने प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाणार आहे.

या शिबिरामध्ये सहभागी खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया तर्फे प्रमाणपत्र व क्लब तर्फे पदकांचे वाटप करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये निवड झालेल्या खेळाडूंना क्लब तर्फे फुटबॉल गणवेश देण्यात येईल तसेच जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी करण्यात येईल. शिबिराचे उदघाटनावेळी १४४ खेळाडूंनी नोंदणी करून सहभाग घेतला आहे .

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!