सूलाची वाईन आता चीनच्या बाजारपेठेत

0

नाशिक । प्रतिनिधी
सुला विनियार्ड्सने चीन देशात आपली वाईन सादर केली आहे. आशिया, युरोप, अमेरिका, कॅनडा समवेत 30 देशांमध्ये निर्याती सोबतच वाईन बाजारपेठेसाठी दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या चीनच्या बाजारपेठेत सूलाचे पदार्पण झाल्याने हा मैलाचा दगड ठरणार असल्याचे सुला विनियार्ड्सचे संस्थापक व सीईओ राजीव सामंत यांनी सांगितले. विसाव्या वर्षात सुला आपल्या उचत्तम पातळीकडे वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.

सुला विनियार्ड्सने नानजिंग ग्लोरी इंटरनॅशनल सोबत भागीदारी केली आहे. ही कंपनी चीन मधील आघाडीची आयातदार व वाईन आणि लिकर वितरक कंपनीपैकी एक असुन या कंपनीला दांडगा अनुभवदेखील आहे.

चीन मध्ये मोठे कार्यक्षेत्र असले तरी नानजिंग ग्लोरी सुरवातीला क्षमता असलेल्या ठराविक प्रांतांमध्ये लक्ष केंद्रित करणार आहे. यात प्रमुख्याने जीअंगसु, शानडाँग, शांघाई, झेजिंग, अनहुई आणि हँगझु या प्रांतांचा समावेश आहे. सुला वाईन्स तर्फे आपल्या वाईन शृंखलेतील सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या वाईन्स अवगत करत आहे.

यात सुला ब्रूट ट्रॉपिकल, सुला सौवीगनॉन ब्लँक, सुला दिंडोरी रिझर्व्ह शिराज आणि सुला शिराज या वाईन्स चा समावेश आहे. पहिल्या टप्यात सुपर मार्केट, रेस्टोरंट्स समवेत सुमारे 200 रिटेल आऊटलेट्समध्ये वाईन उपलब्ध करून दिली जाणार आहे.

LEAVE A REPLY

*