सुलाने पटकावले दहा अवॉर्डस्

0
दर्जेदार वाईन निर्मितीसाठी जगभरात प्रसिध्द असलेल्या सुला विनयार्डसने आत्तापर्यंत अनेक पुरस्कार पटकावले आहेत.अत्यंत मानाचा समजला जाणारा व जागतीक स्तरावर प्रशंसनीय असा ड्रिंक्स बिझनेस अवॉर्ड सुलाला मिळाल्यानंतर सुलाने पटकावलेल्या पुरस्कारांच्या श्रृंखलेत आणखी एका पुरस्काराची भर पडली आहे.

सुलाला पहिला इंडिया वाईन अवॉर्ड-२०१७ मिळाला आहे. या स्पर्धेत भारतीय तसेच परदेशातील वाईन उत्पादकांनीही सहभाग घेतला होता.

पहिल्या मास्टर ऑफ वाईन-सोनल हॉलंड यांच्या अध्यक्षतेखाली तर इंडियन वाईन अकॅडमीचे संस्थापक व अध्यक्ष सुभाष अरोरा यांच्या उपाध्यक्षतेखाली हे यश मिळाले आहे.

श्री.अरोरा यांनी सुमारे ५० स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून महत्वाची भूमिका बजावली आहे.

इंडियन वाईन ॲवार्डच्या अंतर्गत तीनशेएक वाईन्सचे दोन दिवस परीक्षण केले गेले आणि त्यानंतर पुरस्कार विजेत्या वाईन्सची निवड करण्यात आली. भारतातील अग्रणी वाईन उत्पादक कंपनी असलेल्या सुला विनयार्डसच्या आयात शाखा असलेल्या सुला सिलेक्शन्सने तब्बल दहा पुरस्कार पटकावले आहेत. हे पुरस्कार स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय वाईन्ससाठी देण्यात आले आहेत.

पुरस्कार मिळाल्याबद्दल सुलाच्या मार्केटींग व ग्लोबल ब्रँड अँबेसेडर सिसलिया ओल्डन म्हणाल्या, उत्कृष्ट सोहळा आयोजनासाठी पुढाकार घेतल्याबद्दल प्रथम मी आयोजकांचे धन्यवाद मानू इच्छिते. या पुरस्कारामुळे उत्कृष्ट वाईन बनवणार्या सुलाच्या वाईन मेकर्सला पुन्हा एकदा प्रसिध्दी प्राप्त झाली आहे. सुला सिलेक्शनला पुरस्कार मिळणे म्हणजे आम्ही आयात क्षेत्रातही आघाडीवर असल्याची पावती आहे.

आमच्या ब्रूट ट्रॉपिकालची बेस्ट इंडियन स्पाक्लींग वाईन म्हणून निवड झाली, यात काही आश्चर्य नाहीच मुळी! असेही त्या म्हणाल्या.

केरळची खासियत, ब्हेज केरला भाजी सोबत सुला रीजलींग २०१६ ने बेस्ट वाईन पेअरींग विथ व्हेज केरला स्ट्यू हा पुरस्कार पटकावून सुवर्ण पदक घेतले. सुला ब्रुट ट्रॉपिकलने बेस्ट इंडीयन स्पार्कलिंग वाईनसाठी तर सुला शेनीन ब्ला्ँ २०१६ व सुला रीजलींग २०१६ सुवर्ण पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. तसेच बटर चिकनसोबत शेनीन ब्ला्ँ २०१६ ला बेस्ट वाईन पेअरींग विथ बटर चिकन या गटातून रौप्य पुरस्कार मिळाला आहे.

सुला रासा शिराज २०१५, सुला दिंडोरी रिजर्व्ह शिराज २०१५, सुला रासा कॅबरने सोव्हिनिओ २०१५ या वाईन्सलाही रौप्य पुरस्कार मिळाला आहे. द कोनोसुर कॅबरने सोव्हिनिओ २०१३ व ले ग्रॅंड नोआ या सुला सिलेक्शन अंतर्गत येणाऱ्या वाईन्सनेही अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पुरस्काराला गवसणी घातली आहे.

इंडियन वाईन अवॉर्डसच्या २०१७ मध्ये पुरस्कार पटकावल्यानंतर सुला विनयार्डस व सुला सिलेक्शन्स यापुढेही गुणवत्ता व दर्जेदार उत्पादनांचे सादरीकरण करत राहणार आहे, असे सिसिलिया यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*