Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

यंदाच्या नाशिक सुलाफेस्टमध्ये शंकर महादेवन येणार

Share

नाशिक : दरवर्षी होणारा सुला फेस्ट म्हणजे वाइन प्रेमींसाठी मेजवानीच असते. आता वाईन आणि संगीत प्रेमींची प्रतीक्षा संपली असून, सुलाफेस्ट २०१९ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत महोत्सवाची घोषणा झाली आहे. नाशिकमधील सुला विनियार्ड्सच्या भव्य अँफिथिएटरमध्ये सुलाफेस्टचा बारावा हंगाम पार पडणार असून, यंदाच्या महोत्सवाचा हेडलाईनर प्रसिद्ध गीतकार, गायक शंकर महादेवन हा असणार आहे.

फेब्रुवारी २ व ३ फेब्रुवारी या दोन दिवशी संगीतप्रेमींना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील बँडसचे सादरीकरण अनुभवण्याची संधी मिळणार आहे. सुलाफेस्ट २०१९ मध्ये सुपर स्टार शंकर महादेवन हा आपला प्रख्यात प्रोजेक्ट ‘माय कंट्री, माय म्युझिक’च्या माध्यमातून विविधतेने नटलेल्या आपल्या देशाची भारतीय आणि लोकसंगीताची शैली सादर करणार आहे. सुला फेस्टच्या सादरीकरणा दरम्यान त्यांच्या बॉलिवूडमध्ये गाजलेल्या गाण्यांची अनुभूती घेण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.

दोनदिवसीय सुलाफेस्टच्या व्यासपीठावर संगीतप्रेमींना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील बँड्सचे सादरीकरण अनुभवण्याची संधी मिळणार आहे. शंकर महादेवन हे ‘माय कंट्री, माय म्युझिक’च्या माध्यमातून विविधतेने नटलेल्या आपल्या देशाची आणि लोकसंगीताची ओळख घडविणार आहेत. त्यांची गाजलेली हिंदी गाणी ऐकण्याची संधीही नाशिककरांना मिळणार आहे. आत्मास्पियरच्या व्यासपीठावर ज्युलिएट फॉक्स (जर्मनी), ऊना दहल (अमेरिका), निखील चीन्नपा (इंडिया ), अंकित्रीएक्स (इंडिया ) आणि शशांति (रशिया) हे कलाकार सहभागी होतील.

लंडन येथील जंगल या इंग्लिश सोल म्युझिकल कलेक्टिव्ह हे फेस्टचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील हेडलाईनर असणार आहेत. त्याच बरोबर सुलाफेस्ट मध्ये मुंबईतील रॅपर व हिप हॉप आर्टिस्ट विवियन आका डीवाईन असणार आहे. लुसिली क्रू (इस्राईल) तर्फे हिप हॉप, फंक अँड सोल हा युके मधील पार्टी सिन मध्ये २०१० पासून आपली छाप सोडत असून त्याचे संगीत अनुभवण्याची संधी मिळणार आहे. आवर्जून दखल घ्यावी अशा आर्टिस्टसमध्ये फॉरलॉक अँड अर्वाक, असस्सीन आका एजंट सास्कॉ अँड रँडी व्हॅलेंटाईन यांचा समावेश आहे.

‘सुलाफेस्ट’च्या नोंदणीला सुरुवात झाली असून,त्याची https://insider.in/sulafest-feb-2019/event येथे माहिती उपलब्ध आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!