Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पंचवटी : विषारी औषध सेवन करून युवकाची आत्महत्या

Share

नाशिक । राहत्या घरी विषारी औषध सेवन करून 18 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी पंचवटीच्या पेठरोड भागात घडली.

अनिकेत संजय गायकवाड (18, रा. लक्ष्मणनगर, पेठरोड, पंचवटी) असे आत्महत्या करणार्‍या युवकाचे नाव आहे. अनिकेतने शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन केले होते.

कुटुंबियांनी त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!