Type to search

Featured

नाशिकला मंत्रीपद की पुन्हा एकदा ठेंगा

Share

नाशिक । प्रतिनिधी
राज्य मंत्री मंडळाचा विस्तार रविवारी (दि.16) होणार असून त्यात नाशिकला मंत्रीपद लाभेल की पुन्हा एकदा ठेंगा मिळेल,याकडे लक्ष लागून आहे. शहरात भाजपाचे तीन आमदार असून मंत्रीपदासाठी त्यांनी जोरदार लॉबिंग केल्याचे समजते. मात्र, इतर पक्षातून भाजपात दिग्गज नेत्यांच्या इनकमिंगमुळे मंत्रीपदासाठी चुरस असून ‘दत्तक’ नाशिकला जागा मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार (दि.17) पासून प्रारंभ होत आहे. त्यापुर्वी रविवारी विदयमान युती सरकारचा शेवटचा मंत्री मंडळ विस्तार होणार आहे. मागील साडेचार वर्षात नाशिकला भाजप कोटयातून मंत्रीपदाची संधी लाभली नाही. दरवेळेस चर्चेत असूनही ऐनवेळी नाशिकचा पत्ता कटा व्हायचा.

विशेष म्हणजे गत विधानसभा निवडणुकीत नाशिककरांनी शहरातून भाजपाचे तीन आमदार निवडून दिले. तसेच, महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘दत्तक’ नाशिकला साद देत एकहाती सत्ता दिली. नाशिककरांनी भरभरुन देऊन देखील मंत्रीमंडळात नाशिकला संधी मिळाली नाही. त्यामुळे नाशिककर नाराज आहेत.

शिवाय तिन्ही आमदारांच्या अंतर्गत गुटबाजीमुळे देखील मंत्रीपदाची संधी हुकली. यंदा मात्र, पुन्हा एकदा नाशिककरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मंत्रीमंडळ विस्तार पूर्वसध्येला तिन्ही आमदारांच्या समर्थकांमध्ये मंत्रीपदाची जोरदार चर्चा झडत होती.

पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य आहे. माझ्यापेक्षा अनेक ज्येष्ठ अनुभवी आमदार आहेत. पक्षाचा आदेश स्विकारला जाईल.
– बाळासाहेब सानप, आमदार

मंत्रीपदाची संधी कोणाला दयायची हा मुख्यमंत्र्याच्या निर्णय आहे. माझ्या पर्यंत अदयाप कोणतीही माहिती नाही.
– प्रा.देवयानी फरांदे, आमदार

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!