राज्य अजिंक्यपद स्कॅश रॅकेट स्पर्धेत 14 वर्ष गटात देवय, निरूपमा अजिंक्य

0

नाशिक । महाराष्ट्र राज्य शालेय स्कॅश रॅकेट स्पर्धेत 14 वर्ष गटात मुलामध्ये नागपूरचा देवय मेहता तर मुलीमध्ये मुंबईची निरुपमा दुबे अजिंक्य ठरले. तर आजपासून 17 वर्ष गटाच्या स्पर्धांना प्रारंभ झाला.

पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुलात क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आणि नाशिक जिल्हा स्कॉश रॅकेट असोसिएशन यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य शालेय स्कॅश रॅकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत 14 वर्षे मुले -मुली, 17 वर्षे मुले -मुली, आणि 19 वर्षे मुले -मुली अश्या तीन वयोगटाचा समावेश असून या स्पर्धेत महाराष्ट्राच्या आठ विभागाचे 240 खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी 14 वर्ष मुलांचा आणि मुलींच्या स्पर्धा खेळविण्यात आल्या. यामध्ये मुलांच्या गटात अंतिम लढतीत नागपूरच्या देवय मेहताने मुंबईच्या नील पासवानचा पराभव करून विजेतेपद पटकावले. तर मुलीच्या गटात मुंबईच्या निरुपमा दुबेने अंतिम लढतीत मुंबईच्याच खुशी जसपालचा पराभव करून मूळचे विजेतेपद पटकावले.

14 वर्षे वयोगटाच्या मुलांच्या झालेल्या उपउपांत्य लढतीत अनुक्रमे देवेश मेहेता, आर्य बजलवार, सारंग हर्णे आणि नील पासवान यांनी आपआप उपउपांत्य सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीची पहिली लढत देवेश मेहेता आणि आर्य बजलवार यांच्यात झाली. या सामन्यातनागपूरच्या देवेश मेहेताने सहज सुंदर खेळ करून ही लाडात 2-0 अशी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर सारंग हर्णे आणि नील पासवान यांच्यात झालेल्या दुसर्‍या उपांत्य सामन्यात नील पासवानने ही लढत 2-0 ने जिंकून अंतिम फेरी गाठली. त्यानंतरनागपूरच्या देवेश मेहेता आणि मुंबईच्या नील पासवान यांच्यात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात देवमने आपल्या अनुभवाच्या जोरावर या सामन्यात आघाडी घेत हा अंतिम सामना सरळ दोन सेटमध्ये जिंकून 14 वर्षे वयोगटाच्या मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले.

14 वर्षे मुलीमध्ये औरंगाबादच्या रेखा नागरे आणि मुंबईच्या निरुपम दुबे यांच्यात झालेल्या पहिल्या उपांत्य लढतीत निरुपमाने वर्चस्व राखून हा सामना 2-0 असा जिंकून अनंतें फेरीत प्रवेश केला. तर दुसर्‍या उपांत्य सामन्यात मुंबईच्या खुशी जसपालने औरंगाबादच्या प्रभगुल कौरला सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून अंतिम फेरी गाठली. मुलींच्या अंतिम लढतीत निरुपम दुबे आणि खुशी जसपाल या दोनही मुंबईच्याच खेळाडूंमध्ये चांगलीच चुरस दिसून आली. पहिल्या सेटमध्ये खुशीने जोमाने खेळ करून हा पहिला सेट जिंकून आघाडी मिळविली.

परंतु दुसर्‍या सेटमध्ये निरुपमाने आपले कसाब पणाला लावून खेळ करत हा दुसरा सेट जिंकून 1-1 अशी बरोबरी साधली. तर तिसर्‍या निर्णायक सेटमध्येही निरुपमाणे सुरवातीपासून आघाडी प्रस्थापित करून 2-3 गुणांची आघाडी राखली. आणि शेवटी निरुपमाणे हा सेटही जिंकून मुलींच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.
तर आज सायंकाळपासन 17 वर्ष गटाच्या स्पर्धांना सुरूवात झाली आहे.

LEAVE A REPLY

*