Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

काझीगढी येथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे काम सुरु

Share

नाशिक : धोकादायक असणाऱ्या काझीगढी येथील रहिवाशांना सूचना देऊनही प्रतिसाद देत नसल्याने आज सकाळी ८ वाजता अग्निशामक विभागामार्फत धोकादायक घरात राहणाऱ्या रहिवाशांना स्थलांतरित करणे बाबतच्या पुनःच सूचना देण्यात आल्या. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता पोलीस फोर्स घेऊन धोकादायक घरातील नागरिकांना प्रथम समन्वयाने समजून सांगून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याबाबत सूचित करण्यात आले.

तथापि काही नागरिकांनी त्यास विरोध दर्शवला त्यामुळे पोलीस फोर्स अंतर्गत कारवाई करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवणे बाबत कारवाई करण्यात आली.

मागील अनेक वर्षापासून काझीगढीचा प्रश्‍न कायम आहे. दर पावसाळ्यात येथील माती सरकते. तरही लोक जिव मुठीत घेऊन राहतात. या ठिकाणी संरक्षण भिंत तयार करण्यात यावी, किंवा पक्के व कायमचे घर मिळावे अशी मागणी येथील नागरिकांनी आहे. दोन दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस सुरू असल्याने येथील थोडी माती सरकली, यामध्ये एका घराचे देखील नुकसान झाले.

यामुळे प्रशासनाने दखल घेत आज यांना येथून दुसर्‍या ठिकाणी हलविण्याची पुर्ण तयारी केली होती. रंगारवाडा मनपा शाळा, गाडगे महाराज धर्मशाळा व बी. डी. भालेकर शाळा या ठिकाणी त्यांच्यासाठी राहण्याची सोय करण्यात आली आहे.

सदर प्रक्रियेत जवळपास तीस ते पस्तीस घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे बाबत कारवाई पूर्ण करण्यात आली. तसेच ज्या घरांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यातील काही घरे बंद स्थितीत होते.

तेथील नागरिकांना विचारपूस केली असता ते त्यांच्या नातेवाईकांकडे किंवा दुसऱ्या ठिकाणी घरे घेऊन तेथे तात्पुरते राहण्यास गेले आहेत. अशा रीतीने दुपारी एक वाजता सदर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दुपारी तीन वाजेनंतर पुन्हा सदरचा ड्राइव्ह घेऊन पडताळणी करण्यात येईल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!