Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

आता ‘एसटी’ साकारणार पर्यावरणपूरक इ-बस

Share

नाशिक । प्रतिनिधी
पर्यावरणपूरक प्रवासी वाहतुकीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळानेही (एसटी) एक पाऊल पुढे टाकले असून एसटीच्या ताफ्यात लवकरच वातानुकूलित इ-बस दाखल केल्या जाणार आहेत.

इंधन बचत आणि पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी एसटी महामंडळाकडून राज्यात वातानुकूलित इ-बसद्वारे प्रवासी सेवा पुरवण्यात येणार आहे. त्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात शंभर इ-बसेस भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. लवकरच यासंदर्भातील निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असून राज्यातील काही प्रमुख मार्गांवर या बसची चाचणी घेण्यात येणार आहे.

प्रदूषण कमी करण्याबरोबरच भविष्यातील पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेसाठी मेट्रो, इलेक्ट्रिक बस आणि लहान इलेक्ट्रिक वाहनांच्या जास्तीत जास्त वापरासाठी केंद्र तसेच राज्य शासन प्रयत्नशील आहे. विशेषतः सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रिक बसेस आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. येत्या काळात राज्यभरात इलेक्ट्रिक बसची संख्या वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत असून यासाठी राज्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या एसटी महामंडळाकडून इ-बस खरेदी करण्यात येणार आहेत.

सुरुवातीच्या काळात शंभर इ-बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. या संबंधीची इ-निविदेची सूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, एसटी महामंडळाकडून पहिल्या टप्प्यात भाडेतत्त्वावर शंभर इलेक्ट्रिक बसेस घेण्यात येणार आहेत. त्यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार आहे.

सुरुवातीला 100 ते 150 किलोमीटरपर्यंतच्या काही मार्गांवर बसेसची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर महामंडळ निर्णय घेणार आहे. इ-बसचा एकंदरीत वापर वाढल्यास महामंडळाचा डिझेलवर होणार कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचणार असून महामंडळ तोट्यातून बाहेर येण्याची शक्यता आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!