Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

‘स्मार्ट’कार्डसाठी आठ हजार प्रवाशांची नोंदणी

Share

नाशिक । प्रतिनिधी
राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांसाठी स्मार्टकार्ड योजना सुरू करण्यात आली असून ठक्कर बाजार बसस्थानक येथे मागील तीन महिन्यात आठ हजार प्रवाशांनी नोंदणी केली आहे. आगार पातळीवर त्याची नोंदणी सुरू असून ज्येष्ठ नागरिकांसह अन्य प्रवास सवलतींसाठी आता स्मार्टकार्ड दिले जात आहे. नाशिकच्या ठक्कर बाझार आगारातून आत्तापर्यंत 200 पेक्षा जास्त स्मार्टकार्ड वितरितही करण्यात आले असून रोजच नागरिकांची नोंदणीसाठी मोठी गर्दी होत आहे.

एसटी महामंडळाकडून प्रवाशांना विविध सवलती दिल्या जातात. त्यात ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत दिली जाते. या व्यतिरिक्त बसने नियमित प्रवास करणार्‍या प्रवाशांना पास दिले जातात. यासाठी आता पासऐवजी स्मार्टकार्ड दिली जाणार आहेत. स्मार्ट कार्डमुळे लाखो प्रवाशांना फायदा होणार असून, महामंडळाच्या डिजिटल उपक्रमाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे.

महामंडळाच्या राज्यातील आगारात या योजनेच्या कार्यवाहीस सुरुवात करण्यात आली आहे. नाशिकमधील आगारांत स्मार्ट कार्ड नोंदणी करण्यास सुरुवात झाली असून येथे येणार्‍या नागरीकांची आणि प्रवाशांची नोंदणी केली जात आहे.

यानंतर साधारण 20 ते 25 दिवसानंतर त्यांना स्मार्ट कार्ड वितरीत केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. या योजनेत प्रवाशांना स्मार्ट कार्ड दिली आहेत. त्यामुळे कागदी पास सांभाळण्याचा त्रास वाचणार आहे. कार्ड रिचार्ज करण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्मार्ट कार्ड आधार कार्डशी संलग्न करण्यात येत असून त्यामुळे आता जन्म तारखेवरून प्रवासी व वाहकांत होणारे वाद कमी होणार आहेत; तसेच कार्ड डिजिटल स्वरुपात असल्याने यामध्ये फेरफार होण्याची शक्यता कमी आहे. नोंदणी करण्यासाठी नागरीकांना आधारकार्ड व बायोमॅट्रिक पद्धतीने बोटाचा ठसा (फिगरप्रिंट) तसेच मतदान कार्ड न्यावे लागेल. नोंदणी करण्यासाठी पन्नास रूपये फी आकारली जाणार आहे.

स्मार्ट कार्डचे प्रकार
वैयक्तिक व अवैयक्तिक असे स्मार्ट कार्डचे दोन प्रकार असून यात शालेय विद्यार्थी, पासधारक, ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिक, क्षय, कर्क, कुष्ठरोगग्रस्तांना सवलत दिली जाणार आहे. स्मार्ट कार्ड अंतर्गत 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांना 4 हजार किमी (प्रतिवर्ष) कमाल प्रवास मर्यादा असणार आहे. तसेच हे कार्ड महाराष्ट्र राज्यापुरतेच सीमित असणार आहे. नोंदणीसाठी सकाळी सात ते सायं 7 असा वेळ ठेवण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!