Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

एसटीचा प्रवास ‘कॅशलेस’ स्मार्ट कार्डची नोंदणी सुरू

Share

नाशिक। प्रतिनिधी
एसटी बसचा प्रवास आता कॅशलेस होणार असून स्मार्टकार्डच्या माध्यमातून तो होणार आहे. एक जूनपासून स्मार्टकार्डच्या नोंदणीला सुरुवात झाली असून महामंडळाच्या डेपोंत या नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्मार्ट कार्ड आले तरीही एसटीचे पारंपारिक तिकिट बंद होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

लाडक्या ‘लालपरी’ ने नुकतीच प्रवासी सेवेची 71 वर्षे पूर्ण केली आहेत. एसटी महामंडळाने देखील काळानुरुप सुुविधा आणि सेवांमध्ये बदल करून प्रवाशांना अधिक सुखकर आणि आरामदायी प्रवास देण्याचा प्रयत्न केला आहे. आता एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी ‘स्मार्ट कार्ड’ आणले आहे.

विविध प्रकारच्या प्रवासी सवलत घेणार्‍या प्रवाशांबरोबरच सर्वसामान्य प्रवाशांनादेखील स्मार्ट कार्ड घेता येणार आहे. त्यासाठी प्रवाशांना मोबाईल प्रमाणेच प्रवाशाला रिचार्ज करावा लागणार आहे. या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवासी महामंडळाच्या कोणत्याही बसमधून प्रवास करू शकणार आहे. स्मार्टकार्डमुळे सुट्ट्या पैशांचा निर्माण होणारा वाद टळणार असून त्याशिवाय पैसे खिशात नसतील, तरीही रिचार्ज केलेल्या स्मार्टकार्डच्या माध्यमातून प्रवाशाला प्रवास करणे सुलभ होणार आहे.

या स्मार्ट कार्ड’ योजनेतील मोठे लाभार्थी हे विद्यार्थी असणार आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या स्मार्ट कार्डचे रजिस्ट्रेशन केले जाणार आहे. या योजनेत सर्व आगारांतील मुख्य बसस्थानकावर विद्यार्थ्यांसाठी ‘स्मार्ट कार्ड’ प्रणालीची नोंदणी केली जाणार आहे. ही नोंदणी झाल्यानंतर 10 ते 15 दिवसांत कार्ड उपलब्ध होणार आहे.

एसटीचा व्यवहार हा कॅशलेस होणार आहे. तिकिटे बंद होणार नाहीत. सर्व डेपोत स्मार्ट कार्डची नोंदणी सुरू आहे.
-नितिन मैंद, विभाग नियंत्रक, नाशिक.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!