नांदगाव डेपोच्या बसने प्रवाशांना शिकवला सबुरीचा धडा

0

नांदगाव (प्रतिनिधी) ता. १६ : नांदगाव आगाराच्या एका एसटी बसने प्रवाशांना आगळ्या पद्धतीने सबुरीचा धडा शिकवला.

त्याचे झाले असे, दुपारी तीन वाजता नांदगांव आगाराची बस क्रमांक ( एम. एच. १४, बी.टी. ०४८६) ही नांदगाव हून निघून मनमाड चांदवड नाशिक मार्गे ब्राम्हणवाडा जाण्यासाठी निघाली.

नांदगाव सोडल्यानंतर वाटेत काही वेळातच बुरकूलवाडी येथे पंक्चर झाली.

बसमध्ये स्टेपनी टायर होते. पण चाक खोलण्यास साधन साहित्य नसल्याने टायर बदलणे शक्य झाले नाही.

त्यामुळे चालक मनमाड डेपोत गेले. पण तिथे हेल्पर चहापाण्याला गेले होते.  तसेच जोपर्यंत हेड मॅकॅनिकचा आदेश मिळत नाही तोपर्यंत चालकास थांबून राहावे लागले.

दोन तास झाल्यानंतरही मनमाड डेपोतून हेल्पर आला नाही. इकडे बसमधील प्रवासी ‘रामभरोसे’च होते.

शेवटी वाट पाहून नाईलाजाने प्रवासी दुसऱ्या खासगी बसने मार्गस्थ झाले. पण पंक्चर चाक काही बदलले गेले नाही.

 ‘सरकारी काम आणि वाट बघत थांब’ याचा अनुभव प्रवाशांना मात्र एसटीच्या तिकीटाचे पैसे खर्चून विकत घ्यावा लागला.

LEAVE A REPLY

*