Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दहावी फेरपरीक्षेचा निकाल आज; असा पहा निकाल?

Share

नाशिक : जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज लागणार असून निकाल जाहीर झाल्यांनतर विद्यार्थांना पुढील शैक्षणिक प्रवेश घेता येणार आहे.

दरम्यान १७ जुलै ते २ ऑगस्ट या काळात हि फेरपरीक्षा घेण्यात आली. मार्चमधील परीक्षेत उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे या फेरपरीक्षेचा निकाल आज (दि. ३०) जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने निकाल पाहता येईल. तसेच संकेतस्थळावरून या निकालाची प्रतही घेता येणार आहे. दरम्यान निकाल पाहण्यासाठी विद्यार्थांना बैठक क्रमांक आणि आईचे नाव लागेल. या दोन्हींशिवाय निकाल पाहता येणार नाही.

निकालासाठी या संकेतस्थळांचा वापर करावा.
▪ mahresult.nic.in
▪ maharashtraeducation.com
▪ hscresult.mkcl.org

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!