Type to search

Breaking News maharashtra नाशिक मुख्य बातम्या

दहावी, बारावीचं वेळापत्रक आलं रे! विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा

Share

नाशिक : विद्यार्थ्यांचं आयुष्याची पहिली पायरी म्हणजेच दहावीचं वर्ष होय. याचा दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावीची परिक्षा ३ मार्च तर, बारावीच्या या परीक्षेला १८ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या १०वी आणि १२वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

दरम्यान शिक्षण मंडळाकडून यापूर्वीच बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक ऑक्टोंबर महिन्यात जाहीर करण्यात आले होते. परंतु विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळावा या हेतूने नव्याने वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदाच्या परीक्षेला १७ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार आहेत.

यंदा दहावीची परीक्षा ३ मार्च रोजी सुरु होणार असून २३ मार्चपर्यंत असणार आहे. तसेच बारावीच्या परीक्षेला १८ मार्च रोजी सरुवात होणार आहे. या दोन्ही परीक्षांचे दिनांक निहाय सविस्तर मंडळाच्या mahahsscboard.in या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!