टेनिसपटू शांभवीची नागपूरात उल्लेखनीय कामगिरी

टेनिसपटू शांभवीची नागपूरात उल्लेखनीय कामगिरी

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक येथील अेेस टेनिस अकादमीची शांभवी सोनवणे हिने नागपुरातील एनडीटीएचए येथे आयोजित करण्यात आलेल्या 12 वर्षांखालील ऑल इंडिया रँकिंग टेनिस स्पर्धेत विजय संपादन केला आहे. तिच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

शांभवीने भिलाईच्या मानांकित नंदीका अग्रवाल हिला 7..5,2..6,6..4 ने पराभूत करून ही स्पर्धा जिंकली. अटीतटीची लढत जवळपास अडीच तास चालली होती. दुसऱ्या सेट मध्ये नंदीकाने स्पर्धेत आघाडी घेतली होती परंतु शांत व संयमपूर्वक खेळाचे प्रदर्शन करीत शांभवीने विजयश्री खेचून आणली. या स्पर्धेत संपूर्ण भारतभरातून स्पर्धक यात सहभागी झाले होते.

12 वर्षाची शांभवी नाशिकमधील सिंबाॅयोसिस शाळेत पाचव्या इयत्तेत शिक्षण घेत आहे. तसेच सध्या ती शहरातील सावरकर नगर येथील रचना ट्रस्टच्या कोर्टमध्ये सराव करते. वयाच्या 8 व्या वर्षांपासून ती सराव करीत आहे.

अेस टेनिस अकादमीचे सर्वेसर्वा व क्रमांक तीनचे प्रशिक्षक आदित्य राव यांच्या मार्गदर्शनाखाली तिने हे यश मिळविले.  अकादमीच्या आणि खेळाडूंच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे राव यांनी देशदूतशी बोलताना सांगितले.

आतापर्यंत अेस अकादमीत राज्य स्तर व राष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू घडवले आहेत. भविष्यकाळात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी खेळाडू तयार करण्याचा मानस असलायचे राव सांगतात.

शांभवीच्या उल्लेखनीय कामगिरीचे रचना ट्रस्टचे डॉ. अर्चिस नेर्लीकर व जॉईंट सेक्रेटरी राजीव देशपांडे यांनी अभिनंदन केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com