बुद्धिबळ स्पर्धेसाठी राष्ट्रीय खेळाडू येणार नाशकात

0

नाशिक | नाशिकच्या मोरफी चेस अकॅडेमीतर्फे 20 जानेवारी 16 वर्षाखालील खेळाडूंसाठी एक दिवसीय राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिकसह राज्यातील अनेक नामांकित बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत. नाशिकमधून प्रचिती चंद्रात्रे, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती (आंतरराष्ट्रीय एलो गुणांकन 2071),  अविष्कार वांनखेडे, माजी राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता (आंतरराष्ट्रीय एलो गुणांकन 1747), वरुण वाघ (आंतरराष्ट्रीय एलो गुंनांकन 1550) (माजी राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता) हे विजेतेपदापासाठी प्रयत्न करणार आहेत.

नाशिकबरोबरच पुणे, मुंबई येथील मानांकीत स्पर्धक स्पर्धेत उतरणार आहेत. या स्पर्धा श्री सहस्त्रार्जून क्षत्रिय समाज मंगल कार्यालय, फेम सिनेमाच्या मागे, नाशिक पुणे रोड येथे होणार आहे.

मागील 25 वर्षापासून मोरफी चेस अकॅडेमीतर्फे जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, व राष्ट्रीय स्तरावर विविध बुद्धिबळ उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले जाते.

स्पर्धेतील विजेत्यांना 10 हजार, 6 हजार, 3 तीन हजार याप्रमाणे पहिल्या 10 खेळांडूंना मुख्य बक्षिसे, 1300, 1200, 1100  (एलो रेटिंग) आंतरराष्ट्रीय गुंनांकनखालील गटासाठी व बिगर मानांकीत (अन-रेटेड) खेळाडूंसाठी रोख बक्षिसे, मुलींमध्ये बुद्धिबळची आवड निर्माण व्हावी व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मुलींसाठी विशेष बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

तसेच 7, 9, 11 व 13 वर्षाखालील मुलामुलींसाठी प्रोत्साहानपर बक्षिसे अशी एकूण 25 रोख बक्षिसे व 30 मेडल्स देवून विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. नाशिकच्या बाल खेळांडूंसाठी ही स्पर्धा म्हणजे एक पर्वणी असून येवढ्या मोठ्या प्रमाणात बाल गटाला बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी या स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्यांदाच मिळत आहे.

एएमसीए व व हंगामी बुद्धिबळ समिती, नाशिक यांच्या मान्यतेने या स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी आवश्यक असलेले बुद्धिबळ संच व घड्याळ सयोजकांतर्फे खेळाडूंना पुरविण्यात येणार आहे. तसेच नवोदित खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होता यावे यासाठी विशेष बुद्धिबळ प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाणार आहे.

स्पर्धेत एकूण 200 खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे. स्थानिक खेळाडूंना बाहेरगावच्या खेळाडूंशी खेळण्याचा सराव व्हावा यासाठी 100 खेळाडू व बाहेरगावच्या 100 खेळाडू याप्रमाणे प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक खेळाडूंनी लवकरात लवकर नाव नोंदणी करण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

मोरफीच्या विविध उपक्रमांचा लाभ आतापर्यंत नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंना झाला असून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत.

LEAVE A REPLY

*