महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस : नाशिकच्या ‘तनिषा कोटेचा’ला सबज्युनियरचे विजेतेपद

0

वेगवेगळ्या  गटात वरद लोहाट, नभा किरकोले ,अक्षत जैन, सना डिसुझा, हार्वेश असरानी, मनुश्री पाटील, रेगन अल्बुकर्क विजयी  

 
नाशिक दिनांक १२ ऑगस्ट : नाशिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने नाशिक जिमखाना येथे आयोजित  ३ ऱ्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस मानांकन स्पर्धेच्या आजच्या शेवटच्या दिवशी ज्युनीयर, सबज्युनियर, कॅडेट आणि मिडजेट या चारही गटांचे अंतिम सामने खेळविले गेले.
यामध्ये सब ज्युनीयर मुलीच्या गटात यजमान नाशिकची तनिषा कोटेचा आणि तीया वाघ यांच्यात अत्यंत चुरशीच्या  झालेल्या अंतिम सामन्यात तनिषाने जोमाने खेळ करून हा सामना ४-२ असा जिंकून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
मिडजेट मुलांच्या गटात चवथा मानांकित परभणीचा वरद लोहाट आणि पुण्याच्या चवथा मानांकितअभिराज सकपाळ यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात वरद लोहाटने या सामन्यावर संपूर्ण पकड राखत हा सामना सरळ ३-० असा जिंकून विजेतेपद पटकावले. मिडजेट मुलीमध्ये दुसरे मानांकित नभा किरकोले (पुणे ) आणि प्रथम मानांकित अकोल्याच्या रिया कोठारी यांच्यात अंतिम सामना पार पडला. या चांगल्याच रंगलेल्या सामन्यात २-२ अशी बरोबरी झाली. त्यामुळे सर्वांचे लक्ष लागलेल्या निर्णायक गेममध्ये नभा किरकोलेने सय्यमाने खेळ करून हा गेम ११-०६ असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव पक्के केले.
कॅडेट मुलांच्या गटात चवथा मानांकित अक्षत जैन (मुंबई उपनगर ) आणि नील मुळे (पुणे) यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरच्या अक्षत जैनने ४-२ अशी लढत जिंकून विजेतेपद मिळविले.
 कॅडेट मुलीमध्ये केईशा झवेरी (मुंबई शहर) आणि सना डिसुझा  (मुंबई उपनगर ) यांच्यात झालेला सामना चांगलाच रंगला. यामध्ये दोनही खेळाडूंनी ३-३ गेम जिंकून चुरस निर्माण केली. परंतु शेवटच्या निर्णायक गेममधे सना डिसुझाने   सुरवातीपासूनच आघाडी घेत हा गेम ११-०५ असा जिंकून या गटाचे विजेतेपद मिळविले.
सबज्युनियर मुलांच्या गटात मुंबय उपनगरच्या हार्वेश असराणीने हा अंतिम सामना ३-१ असा जिंकून विजेतेपद पटकावले.
ज्युनियर मुलीमध्ये अंतिम लढतीत मनुश्री पाटीलने तेजल कांबळेचा ३-१ असा पराभव करून या गटाचे विजेतेपद मिळविले. तर  ज्युनियर मुलामध्ये रंगतदार झलेल्या सामन्यात मुंबईच्या रेगन अल्बुकर्कने दोन गेमची आघाडी मिळविली तर तिसरा गेम अश्विन सुब्रमणियमने जिंकून या सामन्यात रंगात आणली. परंतु   रेगन अल्बुकर्कने  नंतरच्या दोन गेममधे सहज सुंदर खेळ करून हा सामना ४-१ असा जिंकून मुलांच्या  ज्युनीयर गटाचे विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेच्या पारितोषिक समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे आमदार हेमंत टकले. आमदार  देवयानी फरांदे, सीमा हिरे, सुहास फरांदे,  महानगरपालिकेचे सभागृह नेते दिनकर पाटील, रंजन ठाकरे,  महाराष्ट्र टेबल टेनिस असोसिएशनचे सेक्रेटरी जनरल प्रकाश तुळपुळे, मानद सचिव यतीन टिपणीस, नाशिक जिमखाना सरचिटणीस राधेश्याम मुंदडा, स्पर्धा संयोजन समिती अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सरचिटणीस  शेखर भंडारी, राजेश भरवीरकर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व गटाच्या विजेत्या खेळाडूंना  आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी स्पर्धा आयोजनात सहकार्य करणारे महाराष्ट्र टेबल टेनिस असोसिएशनचे कार्यकारी सदस्य श्रीराम कोणकर, श्रीकांत महिंद्र चिपळूणकर,  पंच प्रमुख रोहित शिंदे, अँमको कंपनीचे मनोज सुरी, संजय मोडक आदींचाही सत्कार करण्यात आला.
स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल स्पर्धेचे आयोजक नरेंद्र छाजेड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक लोकप्रतिनिधींनी केले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाशिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि नाशिक जिमखान्याचे कार्यकर्ते यांनी परीश्रम घेतले.
अंतिम  सामन्यांचे निकाल खालील प्रमाणे :-
मिडजेट मुले 
 वरद लोहात  (परभणी ) वि.वि. अभिराज सकपाळ (पुणे  ) ११-०८, ११-०६, ११–०७.
मिडजेट मुली :- 
नभा किरकोले (पुणे ) विजयी विरुद्ध प्रिया कोठारी ( अकोला) ११-०६, ११-०७, ०७-११, ०६-११, ११-०६.
कॅडेट मुले 
अक्षांत जैन (मुंबई उपनगर)  विजयी विरुद्ध  नील मुळे (पुणे ) १२-१०, ०८-११, ०७-११, १२-१०, ११-०४, ११-०७.
कॅडेट  मुली :- 
सना डिसुझा  (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध प्रिकेईशा झवेरी (मुंबई शहर)  ०७-११, १४-१२, ०७-११, ०६-११, ११-०८, ११-०५, ११-०५.
सब ज्युनीयर  मुले 
 हविश असरानी   (मुंबई उपनगर)  विजयी विरुद्ध जेस मोदी (मुंबई उपनगर)  १२-१०, ११-०९, १२-१०, ११-०४.
सब ज्युनीयर  मुली :- 
  तनिषा कोटेचा (नाशिक ) विजयी विरुद्ध  तिया वाघ (ठाणे) ०८-११, ११-०९, ११-०६, १०-१२. १५-१३, ११-०५.
 ज्युनीयर  मुले 
  चिन्मय सोमय्या ( (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध  रेगन अल्बुकर्क ((मुंबई उपनगर) ११-०५, १३-११, ०७-११, १३-११, १३-११.
  ज्युनीयर  मुली :- 
तेजाळ कांबळे (ठाणे) मनुश्री पाटील (मुंबई उपनगर) ११-०८, ११-०४, ११-०६, ११-०३.

LEAVE A REPLY

*