Type to search

Breaking News क्रीडा नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : माहेश्वरी बॉक्सक्रिकेटद्वारे महिला सबलीकरण

Share

नाशिक । प्रतिनिधी
खेळप्रकारात दिवसागणिक बदल करत शहरातील माहेश्वरी युवक मंडळाच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून माहेश्वरी कौटुुंबिक बॉक्स क्रिकेट लीगची सुरुवात केली आहे. येत्या 1 जुनपासून दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धा रनभुमी या कर्मयोगिनी नगर येथील बॉक्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळवल्या जाणार आहेत. या स्पर्धेसाठी देशदूत आणि देशदूत टाईम्स माध्यम प्रायोजक आहेत.

या स्पर्धेत एकुण 24 संघ सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या सीझनमध्ये ग्रामीण भागातील तीन संघांनी या स्पर्धेत नावनोंदणी केल्यामूळे चुरस अधिक वाढली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.

एकुण सहा षटकांचा एक सामना असून आठ खेळाडू एका टीममध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. एका दिवशी 52 ते 56 सामने खेळवले जातील. साखळी पद्धतीने खेळवण्यात येणार्‍या सामन्यांमध्ये चार गटातील प्रत्येक टीमला एकमेकांशी दोन हात करावे लागणार आहेत. उर्वरीत सामने 2 जून रोजी खेळवले जातील.

या स्पर्धांच्या आयोजनासाठी श्री माहेश्वरी युवक मंडळाचे अध्यक्ष प्रांजल पलोड तसेच दिपक भुतडा, जीवन हेडा, सागर मंत्री, सागर लोया, सुरज काबरा, वल्लभ धूत, मयुर झंवर, जयेश भन्साली, गोपाल भुतडा, प्रांजल आगीवाल, तुषार नवाल, दुर्गेश चांडक, राहुल लोया, किरण चांडक, राहुल माहेश्वरी, तुषार मनियार, रविंद्र पलोड आदी परिश्रम घेत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!