Type to search

क्रीडा नाशिक

नासिक जिमखाना क्रीडा महोत्सवाचे आयोजन

Share

नाशिक : नासिक जिमखाना आयोजित क्रीडा महोत्सव दि. १८ जानेवारी २०१९ ते दि. ३० जानेवारी २०१९ पर्यत नासिक जिमखाना, शिवाजी रोड येथे होणार आहे.

सदर स्पर्धेमध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, लाँन टेनिस व बुद्धिबळ या क्रीडा स्पर्धांचा समावेश असून सदर स्पर्धा विविध वयोगटात खेळल्या जाणार आहे. विजयी खेळाडूंना स्मृतिचिन्हे देऊन गौरवण्यात येणार आहे. बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धा या जिल्हा मानांकित स्पर्धा आहेत. जिल्ह्याच्या संघ निवडीसाठी या स्पर्धेचा विचार करण्यात येईल.

सदर महोत्सवात बॅडमिंटन दि. २३ जानेवारी ते दि. २७ जानेवारी २०१९ , टेबल टेनिस दि. २५ जानेवारी ते दि. २८ जानेवारी २०१९, टेनिस दि. १९ व २० जानेवारी २०१९ तसेच दि. २६ व २७ जानेवारी २०१९ व बुद्धिबळ दि. २६ व २७ जानेवारी २०१९ या दरम्यान खेळविल्या जाणार आहेत.

सदर स्पर्धेमध्ये भाग घेणा-या स्पर्धकांनी नासिक जिमखाना, शिवाजी रोड येथे सकाळी ९.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेमध्ये आपल्या प्रवेशिका संस्थेच्या कार्यालयात जमा करावयाच्या आहेत. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष नरेंद्रजी छाजेड, मानद सचिव राधेश्याम मुंदडा व सहसचिव शेखर भंडारी यांनी संयुक्तपणे दिली.

संस्थेच्या वतीने जास्तीत जास्त खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घ्यावा यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!