Type to search

क्रीडा

नाशिक जिल्हा सेपक टकरा संघ जाहीर

Share

नाशिक : नाशिक जिल्हा सेपक टकरा असोशिएशनच्या वतीने मेरी येथिल पोकर कॉलनी, पंचवटी येथे १५ मे, २०१९ रोजी ज्युनियर गटाच्या नाशिक जिल्हा संघाची निवड करण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते.

या चाचणीतुन नाशिक जिल्याच्या मुलांच्या आणि मुलीच्या संघासाठी १२ – १२ संभाव्य खेळाडूंची निवड करण्यात आली. या निवड झालेल्या संभाव्य खेलाडुचे १० दिवस सराव शिबीर घेण्यात आले. या शिबीरानंतर संघाची अंतिम निवड करण्यात आली. या निवड झालेल्या खेळाडूंनी राज्य स्पर्धेत चांगली कामगीरी करावी, यासाठी त्यांना नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, शिव छात्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे, संजय होळकर यांनी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्य सेपक टकरा स्पर्धा दिनांक २८ ते ३० में, २०१९ दरम्यान अमरावती येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

सेपक टकरा या खेळात नाशिकच्या संघाने नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. यावेळीही नाशिक जिल्हाच्या संघाचे सराव शिबीर चांगल्या प्रकारे पार पडले आहे. या शिबीरामुळे खेळाडूंच्या गुणवत्तेत चांगली प्रगती दिसून येत आहे. त्यामुळे अमरावती येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेतही नाशिकचे हे दोन्हीही संघ चांगली कामगिरी करतील असा विश्वास जिल्हा सचिव कुणाल अहिरे यांनी व्यक्त केला.

निवड झालेल्या खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे
मुले : कृष्णेश हल्ले, निखिल शिंदे, शुभम पिंगळे , शुभम वराडे , मकरंद काणे.
मुली : मधुरा टोपले, नेहा कोहळे, जान्हवी भंडारी, ऐश्वर्या वाघ, रेवती शिंदे.

या संघाबरोबर संघ प्रशिक्षक म्हणून कुणाल अहिरे आणि अमोल राठोड तर व्यवस्थापक म्हणून योगेश निचाळ हे काम बघणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!