आमदार सानप कबड्डी स्पर्धा २०१८ ; उपांत्य फेरी चुरशीची होणार

0

नाशिक : आडगाव येथे सुरु असलेल्या ४५ व्या कुमार व कुमारी जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी बाळासाहेब सानप आमदार कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी कुमार गटाच्या ब्रह्मा स्पोर्ट्स, आडगाव, क्रीडा प्रबोधिनी, नाशिक –अ, शिवशक्ती, आडगाव-अ, शिखरेवाडी क्रीडा मंडळ नाशिकरोड, यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

सकाळ सत्रात झालेल्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात क्रीडा प्रबोधिनी-अ संघाने गुरदेव शिंदे, अंकुश मेसराम, व संभा मढवी, यांच्या खेळावर चढायाच्या जोरावर क्रीडा प्रबोधिनी-ब संघाचा ३४ विरुद्ध २६ असा ८ गुणांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली, मध्यंतरापर्यंत क्रीडा प्रबोधिनी-ब संघाकडे १८ विरुद्ध ८ अशी १० गुणांची भक्कम आघाडी असतांना सुद्धा गचाळ क्षत्ररक्षणामुळे पराभवाला सामोरेजावे लागले.

पराभूत संघाकडून प्रतिक शिंदे, प्रसाद टिळे, अन्सार खान यांनी चांगला खेळ केला. दुसऱ्या एका अटीतटीच्या सामन्यात शिवशक्ती आडगाव ने श्री साई सिडको या संघाचे कडवे आव्हान अखेरच्या क्षणी मोडीत काढत २५ विरुद्ध २४ अशा अवघ्या एका गुणाने विजय संपादन केला. शिवशक्ती आडगाव कडून राष्ट्रीय खेळाडू सनी मते, मकदूम सय्यद, यांनी आपल्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

तिसऱ्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात या स्पर्धेचा प्रबळ विजेता समजला जाणारा ब्रह्मा स्पोर्ट्स आडगाव-अ ने तुषार माळोदे, आकाश शिंदे, अक्षय हिंदे, साकिब सय्यद, रोहित माळोदे, अक्षय रिकामे, ओमकार पोकळे यांच्या भरभक्कम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर एल.व्ही.एच. मालेगाव या संघाचा ३६ विरुद्ध ६ असा ३० गुणांनी दणदणीत पराभव करून अपेक्षेप्रमाणे उपांत्य फेरी गाठली.

शिखरेवाडी क्रीडा संकुल नाशिकरोड या संघाने के. बी.एच. निमगाव या संघाचा ३१ विरुद्ध ९ असा २२ गुणांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली. विजयी संघाकडून पवन भोर, शंकर पंदिकोडे, प्रीतेश काळे, आनंता जाधव, शुभम नागरे, शुभम पवार यांनी चांगला खेळ केला.

 

२९ जुलै २०१८ रोजी सकाळ सत्रातील झालेले उपउपांत्य पूर्व फेरीचे कुमार गटाचे निकाल पुढीलप्रमाणे

 • ब्रह्मा स्पोर्ट्स, आडगाव विजयी विरुद्ध एस.पी.एच. नाशिक-ब (३५-१२)
 • एल.व्ही.एच. मालेगाव विजयी विरुद्ध सम्राट क्रीडा मंडळ, मनमाड (४६-३९)
 • के.बी.एच.निमगाव विजयी विरुद्ध जयभवानी, मनमाड (४७-१०)
 • शिखरेवाडी क्रीडा संकुल, नाशिकरोड विजयी विरुद्ध रणझुंजार, पांढूर्ली (३९-२४)
 • श्री साई सिडको-अ विजयी विरुद्ध श्रीराम क्रीडा मंडळ, नांदगाव (४२-२०)
 • शिवशक्ती क्रीडा मंडळ, आडगाव-ब विजयी विरुद्ध जयशंकर क्रीडा मंडळ, नामपूर (३२-१७)
 • क्रीडा प्रबोधिनी-ब, नाशिक विजयी विरुद्ध मनमाड बॉइज, मनमाड (४५-२०)
 • क्रीडा प्रबोधिनी-अ, नाशिक विजयी विरुद्ध सांस्कृतिक क्रीडा मंडळ, मनमाड.

कुमारी गटाचे निकाल पुढीलप्रमाणे

 • रचना क्लब, नाशिक विजयी विरुद्ध एस.पी.एच.सिडको (४०-३)
 • शिवशक्ती, आडगाव-अ विजयी विरुद्ध गुलालवाडी व्यायामशाळा, नाशिक (४५-१०)
 • क्रीडा प्रबोधिनी नाशिक-अ विरुद्ध सम्राट क्रीडा मंडळ, मनमाड, (४२-१३)
 • क्रीडा प्रबोधिनी नाशिक-ब विजयी विरुद्ध श्री साई सिडको (३६-१५)
 • रचना क्लब, नाशिक विजयी विरुद्ध शिवशक्ती आडगाव-ब (३२-१५)
 • शिवशक्ती आडगाव-अ विजयी विरुद्ध शिखरेवाडी क्रीडा संकुल, नाशिक रोड (४६-१४)

सदर स्पर्धेतून ४५ व्या कुमार व कुमारी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याचे कुमार व कुमारी गटाचे संघ निवडण्यात येणार आहे. कुमार गटाच्या निवड समितीचे सदस्य म्हणून बाळासाहेब जाधव, शरद पाटील, दीपक सुर्यवंशी, तर कुमारी गटाच्या निवड समितीचे सदस्य म्हणून डॉ. सारिका जगताप, सुरेश शिंदे, सतीश जाधव, तर पंच प्रमुख म्हणून जॉर्ज स्वामी हे काम पाहत आहे.

स्पर्धा यशस्वितेसाठी नाशिक जिल्हा कबड्डी असोशिएशनचे प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड व क्रीडा जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष सागर माळोदे, भा.ज.पा. युवा मोर्चाच्या राज्य क्रीडा आघाडीचे उपाध्यक्ष विजय बनछोडे, रणजीत राऊत, प्राध्यापक संतोष जाधव, मनोज मते, सचिन लभडे, बाजीराव सुर्यवंशी, विनोद लभडे, संतोष हळदे, नाथा हळदे, वसीम सय्यद, राधाकिशन शिंदे, आदी प्रयत्न करीत आहे.

LEAVE A REPLY

*